विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) आणि ऑईल इंडिया लिमिटेड यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी
Posted On:
21 APR 2023 2:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 एप्रिल 2023
ऊर्जा मूल्य शृंखलेमधील निवडक क्षेत्रामध्ये तांत्रिक सहकार्य सुरु ठेवण्यासाठी ,वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर), नवी दिल्ली आणि ऑइल इंडिया लिमिटेड ( ओआयएल), नवरत्न एनओसी यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
परस्परांची निश्चित भूमिका (umbrella MoU) ठरवणारा सामंजस्य करार ओआयएल आणि सीएसआयआर प्रयोगशाळा यांच्यातील सहकार्यासाठी एक औपचारिक आराखडा तयार करतो. ऊर्जा सुरक्षेसाठी प्रगत तंत्रज्ञानामध्ये संशोधन सुरु ठेवण्यासाठी सहकार्य उपलब्ध करणे हा या सामंजस्य कराराचा उद्देश आहे. संयुक्त संशोधन आणि विकास उपक्रम आणि तंत्रज्ञान सहकार्यासाठी निश्चित केलेल्या प्राथमिक क्षेत्रांमध्ये खालील समाविष्ट आहे:
- हायड्रोकार्बन अन्वेषणामध्ये नवी आघाडीची क्षेत्रे;
- अपस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीम परिचालन
- नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा, बॅटरी/साठवणूक व्यवस्था
- हरित आणि नवीकरणीय हायड्रोजन / जैव हायड्रोजन (H2)
- पर्यावरणीय प्रदूषण आणि बायोरिमेडिएशन कमी करणे
- तेल वेगळे करणे आणि कच्च्या तेलाच्या गाळासह सांडपाणी आणि कचरा गाळाच्या पुनर्वापरासाठी कचऱ्यावर प्रक्रिया
- क्षारण तपासणी आणि क्षारण विरोधी संरक्षण
- तेलयुक्त पाण्यामधून लिथियम आणि दुर्मिळ पृथ्वी घटकांचे निष्कासन ;
- रेणूंना इंधन देण्यासाठी नैसर्गिक वायूचा अखंड पुरवठा आणि
- डिकार्बोनायझेशन आणि कार्बन उत्सर्जनाचे निव्वळ शून्य लक्ष्य.
प्रशिक्षण आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून क्षमता बांधणी करण्याच्या दिशेने काम करण्याबद्दलही दोन्ही संस्थांनी सहमती दर्शवली आहे. शाश्वत विकास उद्दिष्टे, आकांक्षी जिल्हे, ग्रामीण विकास, सरकारी मोहिमा/उपक्रम इत्यादी साध्य करण्यासाठी कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निधी सहाय्य प्रदान करण्याचा देखील ऑईल इंडिया लिमिटेड विचार करेल.
S.Thakur/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1918521)
Visitor Counter : 166