पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
प्रमुख अर्थव्यवस्थांच्या उर्जा आणि हवामान या विषयाशी संबंधित मंचातील नेत्यांच्या बैठकीत संयुक्तपणे सुधारित कृतीवर भर देण्यासह हवामान बदल हे सर्वात मोठे आव्हान असल्याचे सर्व नेत्यांचे मत
प्रविष्टि तिथि:
20 APR 2023 10:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 एप्रिल 2023
अमेरिकी सरकारने दिनांक 20 एप्रिल 2023 रोजी आभासी पद्धतीने प्रमुख अर्थव्यवस्थांच्या उर्जा आणि हवामान या विषयाशी संबंधित मंचातील नेत्यांची बैठक आयोजित केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडेन यांनी या बैठकीचे अध्यक्षपद भूषविले तर जगभरातील विविध देशांचे प्रमुख आणि इतर मंत्री या बैठकीला उपस्थित होते. या गटामध्ये जगातील 20 प्रमुख अर्थव्यवस्था सहभागी असून त्यात अर्जेन्टिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन,इजिप्त,युरोपीय महासंघ,फ्रान्स,जर्मनी,भारत,इंडोनेशिया,इटली,जपान,दक्षिण कोरिया,मेक्सिको,सौदी अरेबिया,तुर्कस्थान,संयुक्त अरब अमिरात आणि युके या देशांचा समावेश आहे.
हवामान बदल हे सर्वात मोठे आव्हान असून त्यावर संयुक्त सुधारित कृती आवश्यक असल्याचे मत सर्व नेत्यांनी व्यक्त केले.

या बैठकीत, उपस्थितांना संबोधित करताना, केंद्रीय पर्यावरण,वने आणि हवामान बदल विभागाचे मंत्री भूपेंद्र यादव यांनी, जागतिक दरडोई उत्सर्जन पातळीच्या एक तृतीयांश उत्सर्जनासह, भारत हवामान बदलाच्या समस्येशी लढण्यासाठीच्या जागतिक प्रयत्नांमध्ये आघाडीवर आहे यावर अधिक भर दिला.यावेळी त्यांनी उर्जा, वाहतूक, नौवहन, हायड्रोफ्लुओरोकार्बन्स यांसारख्या क्षेत्रांतील हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी भारताने सुरु केलेल्या उपक्रमांचे तसेच कार्बन कॅप्चर वापर आणि साठवण यासाठी हाती घेतलेल्या उपक्रमांचे ठळकपणे वर्णन केले.


S.Kakade/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1918432)
आगंतुक पटल : 197