निती आयोग
azadi ka amrit mahotsav

भारताला जागतिक कृषी-तंत्रज्ञान क्षेत्रातील नेता बनवण्यासाठी एआयएम, नीती आयोग आणि युएनसीडीएफ एकत्र येऊन काम करणार, अभिनव संशोधनांचा लाभ विकसनशील देशांना देणार

Posted On: 20 APR 2023 8:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 एप्रिल 2023

अटल नवोन्मेष अभियान (एआयएम), नीती आयोग  आणि संयुक्त राष्ट्रांचा भांडवल विकास निधी (युएनसीडीएफ) यांनी आज एकत्रितपणे श्वेतपत्रिका सादर केली. भारताला जागतिक कृषी-तंत्रज्ञान क्षेत्रातील नेता म्हणून घडविणे आणि या अभिनव संशोधनांचा लाभ आशिया तसेच आफ्रिकेतील कमी विकसित देशांना करून देणे हा या श्वेतपत्रिकेचा उद्देश आहे.

एआयएम, नीती आयोग  आणि युएनसीडीएफ यामधील तज्ज्ञांनी  अत्यंत परिश्रमपूर्वक तयार केलेल्या या श्वेतपत्रिकेमध्ये कृषी-तंत्रज्ञानविषयक स्टार्ट अप उद्योगांसमोर उभ्या राहणाऱ्या आव्हानांवर मात करणे आणि  या स्टार्ट अप उद्योगांची राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरतील वृद्धी सुलभ करणे यासाठी उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत.

कृषी क्षेत्रासमोरील समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी आणि विकसनशील अर्थव्यवस्थांमधील लहान शेतकऱ्यांना पाठबळ पुरविणाऱ्या शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक महत्त्वपूर्ण निरीक्षणे तसेच शिफारसी यांची रूपरेषा या श्वेतपत्रिकेत मांडण्यात आली आहे. अन्न सुरक्षा, पुरवठा साखळीतील अकार्यक्षमता  तसेच हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या चिंताजनक बाबींवर उपाय शोधण्यासाठी कृषी-तंत्रज्ञान क्षेत्रातील नवोन्मेष उपयुक्त ठरणार आहे.

या श्वेतपत्रिकेचे सादरीकरण हा  भारताला कृषी-तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक नेता म्हणून घडविणे आणि या अभिनव संशोधनांचा लाभ आशिया तसेच आफ्रिकेतील कमी विकसित देशांना करून देण्याच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे. हे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने एकत्र येऊन काम करणे आणि कृषी क्षेत्रात शाश्वत तसेच सर्वसमावेशक विकास घडवून आणणे यासाठी   एआयएम, नीती आयोग  आणि युएनसीडीएफ कटिबद्ध आहेत.

 

 

S.Kakade/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1918400) Visitor Counter : 203


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu