नागरी उड्डाण मंत्रालय

जानेवारी-मार्च 2023 दरम्यान देशांतर्गत प्रवासी हवाई वाहतुकीमध्‍ये 51.70% वाढ


प्रवाशांच्या तक्रारींमध्ये लक्षणीय घट

Posted On: 19 APR 2023 6:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 एप्रिल 2023

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या मार्च 2023 च्या वाहतूक अहवालात असे नमूद केले आहे की, जानेवारी ते मार्च 2023 या कालावधीत देशांतर्गत विमानसेवेचा लाभ  375.04 लाख लोकांनी घेतला. याच कालावधीत म्हणजे  जानेवारी ते मार्च 2022 दरम्यान  प्रवासी संख्‍या  247.23 लाख होती. हवाई प्रवाशांमध्‍ये वार्षिक वाढ 51.70 टक्के  आणि मासिक वाढ 21.41 टक्के नोंदवली गेली आहे.

मार्च-2019 च्या माहितीबरोबर  तुलना येथे करण्‍यात आली आहे:

Jan.-March 2019                     

Jan.-March 2023  

Change

354.53 Lakhs

375.04 Lakhs   

20.51 Lakhs (+5.8%)

प्रवाशांच्या तक्रारी:

हवाई प्रवास करणा-या प्रवाशांच्या तक्रारींमध्ये लक्षणीय घट झाली आहे आणि तक्रारींचे निराकरण करण्यात वाढ झाली आहे :

  • मार्च 2019 च्या तुलनेत (1684 तक्रारी), मार्च 2023 मध्ये तक्रारी कमी (347 तक्रारी) झाल्या आहेत
  • मार्च 2019 मध्‍ये तक्रारींचे निराकरण 93.5% झाले. त्या  तुलनेत मार्च 2023 मध्ये 99% (अंदाजे) तक्रारींचे निराकरण झाले आहे.
  • उड्डाणाची समस्या  - 60.0%, सामान - 16.3%, तिकीट परतावा - 11.8% याप्रमाणे 2019 मध्ये तक्रारीची प्रमुख कारणे होती.  तर मार्च 2023 साठी उड्डाणाची समस्या  - 38.6%, सामान - 22.2%, तिकीट परतावा  - 11.5%, आणि  इतर तक्रारी .5% असे प्रमाण नोंदवले गेले आहे.

प्रवासी वाढ घटक - मार्च 2019 आणि मार्च 2023 यांच्यामध्‍ये तुलना

विस्तारा, एअर इंडिया, एअर एशिया आणि स्टार एअरने मार्च 2023 मध्ये प्रवासी वाढ घटकामध्ये मार्च-2019 च्या तुलनेत वाढ दर्शविली आहे.तर इंडिगो, स्पाइसजेट आणि गो एअर या विमान सेवांमध्ये घट झाली आहे, असे आढळून आले आहे.

Airlines

March 2019

March 2023

Air India

80.8

85.1

SpiceJet

93.0

92.3

Go Air

91.4

90.2

IndiGo

86.0

84.0

Air Asia

87.5

88.6

Vistara

86.8

91.6

Star Air

53.8

74.1

 

‘शेड्यूल्ड डोमेस्टिक एअरलाइन्स’ चा बाजार हिस्सा:

या अहवालात असे नमूद केले आहे की, इंडिगो, विस्तारा आणि एअर एशियाने मार्च 2023 च्या तुलनेत मार्च-2019 मध्ये त्यांच्या बाजार हिश्‍श्यात वाढ दर्शविली आहे तर एअर इंडिया, स्पाइसजेट, गोएअरने घट दर्शविली आहे.

Airlines

Jan-March 2019

Jan.-March 2023

 

Pax carried

Market Share

Pax carried

Market Share

Air India

45.01

12.7

33.70

9.0

Jet Airways

31.61

8.9

-

-

Jet Lite

5.08

1.4

-

-

SpiceJet

48.05

13.6

25.99

6.9

Go Air

32.63

9.2

29.11

7.8

Indigo

156.93

44.3

209.07

55.7

Air Asia

19.37

5.5

27.52

7.3

Vistara

14.13

4.0

33.07

8.8

Trujet

1.63

0.5

-

-

Star Air

0.07

0.0

0.49

0.1

Alliance Air

-

-

4.10

1.1

Akasa Air

-

-

11.38

3.0

Flybig

-

-

0.56

0.2

‘ऑन-टाइम परफॉर्मन्स’ (ओटीपी) – ‘शेड्यूल्ड डोमेस्टिक एअरलाइन्स’: बहुतेक एअरलाइन्ससाठी ओटीपी  मार्च 2019 च्या तुलनेत कमी झाल्याचे दिसून येते. मात्र , इंडिगो आणि एअर इंडियाने त्यांच्या ओटीपी मध्ये सुधारणा केली आहे.चार मेट्रो विमानतळांसाठी  देशांतर्गत विमान कंपन्यांच्या ओटीपीची गणना करण्यात आली आहे. बंगलोर, दिल्ली, हैदराबाद आणि मुंबई आणि 2019 आणि 2023 मधील तुलना खालीलप्रमाणे आहे –

Airlines

 

March 2019

March 2023

Go Air

 

95.2

49.2

Vistara

 

91.9

83.7

Air Asia

 

91.9

76.6

IndiGo

 

89.5

92.0

Jet Airways+Jetlite

 

84.5

-

 

 

 

 

SpiceJet

 

82.9

63.6

Air India

 

69.0

82.1

Akasa Air

 

 

94.2

Alliance Air

 

-

69.1

 

G.Chippalkatti/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1917994) Visitor Counter : 181