आदिवासी विकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ओदिशामधील राऊरकेला इथल्या स्थानिक आदि महोत्सवाची आज झाली सांगता


कार्यक्रमात देशातील विविध भागातल्या 275 कारागिरांचा सहभाग

Posted On: 15 APR 2023 8:37PM by PIB Mumbai

 

ओदिशा मधल्या राऊरकेला इथं एक्झिबिशन मैदानावर स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या राऊरकेला पोलाद प्रकल्पाच्या सहयोगाने आयोजित स्थानिक आदी महोत्सवाची आज सांगता झाली. 7 एप्रिलला  सुंदरगढचे खासदार जुवाल ओराम यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले होते. NCSTचे सदस्य आनंद नायक हे त्यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात देशातील विविध भागातून 275 कारागिरांनी भाग घेतला आणि वनधन विकास केंद्रे,पीव्हीटीजी,  शेतकरी उत्पादक संघटना, जीआय टॅग यांच्या स्टॉलसह , श्री अन्न स्टॉल सारख्या माध्यमातून त्यांनी आपल्या कलाकुसर, संस्कृती आणि खाद्य संस्कृती यांचे दर्शन घडवले.

याशिवाय या कार्यक्रमात नऊ दिवसात दररोज अशा प्रकारे एकूण 140 आदिवासी कलाकारांनी सांस्कृतिक कला सादर केल्या. संथाळ , धारवा, परोजा ,ओराम , किसान , पौंडी  भुयान (पीव्हीटीजी) डोंगरिया कंध(पीव्हीटीजी) आणि कुटिया कंध ( पीव्हीटीजी )या जमातीतील कलाकारांनी आपल्या पारंपारिक कला सादर केल्या.

समारोपाच्या सोहळ्यात निवडक ( एक जिल्हा एक उत्पादन ) उत्पादनांसाठी एक जिल्हा एक उत्पादन चा आरंभ करण्यात आला.यामध्ये पुरी जिल्ह्यातील पट्टचित्र कला, सोनेपूर जिल्ह्यातील बोमकई साडी यांचे प्रदर्शन त्या त्या कारागिरांनी केले. मान्यवरांच्या उपस्थितीत या एक जिल्हा एक उत्पादन या उपक्रमाचा आरंभ करण्यात आला.

अशा प्रकारचे उपक्रम, छोट्या कारागिरांना, ज्यांना बाजारपेठे अभावी आपली उत्पादने विकणे कठीण होते अशा कारागिरांना थेट बाजारपेठ आणि ग्राहक यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करतात. या पहिल्याच वेळी साठजण सहभागी झाले होते. अशा पहिल्यांदा सहभागी झालेल्या कारागीरांकडून अशा प्रकारच्या उपक्रमातील सहभागासाठी प्रोत्साहन मिळते आणि ते आपले उत्पादन वाढवून अधिकाधिक उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कार्यक्रमाचा उद्देश सफल होतो.

***

N.Chitale/V.Sahajrao/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1916979) Visitor Counter : 147


Read this release in: English , Urdu , Hindi