विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
अमेरिकेचे सिनेटर टॉड यंग यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने घेतली राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांची भेट; कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम यासारख्या विविध क्षेत्रात सखोल द्विपक्षीय सहकार्याची अपेक्षा
Posted On:
14 APR 2023 6:48PM by PIB Mumbai
अमेरिकेचे सिनेटर टॉड यंग यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेचे एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र प्रभार)राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांना भेटले. कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, सेमीकंडक्टर, स्वच्छ ऊर्जा , अत्याधुनिक वायरलेस जैवतंत्रज्ञान, जिओ सायन्स, एस्ट्रो फिजिक्स, संरक्षण अशा काही क्षेत्रात अधिक सखोल द्विपक्षीय संबंध व सहकार्याची गरज त्यांनी वर्तवली.
जितेंद्र सिंह यांनी अमेरिकेच्या शिष्टमंडळाशी बोलताना सांगितले की गेल्या नऊ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विज्ञान तंत्रज्ञान संशोधन अशा विषयात व्यक्तिशः रुची दर्शवत आहेत आणि सामाजिक क्षेत्रातल्या योजनांची विज्ञानाधारित उत्तरांच्या आधारे अंमलबजावणी करत सामान्य माणसांचे जीवन अधिक सुखकर करण्यावर त्यांचा भर आहे.
पंतप्रधानांकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे नवीन संधींची दारे उघडली आहेत . तसेच वैज्ञानिक संशोधनाच्या सर्व क्षेत्रात संधी वाढल्या असून अंतराळ, बायोटेक , शाश्वत स्टार्ट अप या क्षेत्रात अधिकाधिक संधींची दारे खुली होत आहेत.
सिनेटर टॉड यंग यांनी काँटम तंत्रज्ञान, समुद्र विज्ञान, अणुऊर्जा, सेमीकंडक्टर्स, सुपर कम्प्युटर आणि इतर नव्याने आकाराला येत असलेल्या तंत्रज्ञानांतील सहकार्य वाढीला लावण्याची तसेच भागीदारीसाठी संधी शोधण्याची सूचना केली.
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंत्री महोदयांना सांगितले की तंत्रज्ञान संशोधन केंद्रे आणि अमेरिकेच्या संशोधन केंद्रामार्फत राबवता येतील असे एकूण 35 संयुक्त प्रकल्प शोधण्यात आले आहेत.
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने आरंभ केलेल्या तंत्रज्ञान संशोधन केंद्र तसेच शैक्षणिक गुणवत्तेचा पाया घालणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान संस्थे सारख्या संस्थांकडून अधिक सहकार्य आणि समन्वय यांसाठी अमेरिका उत्सुक आहे असे सिनेटर टॉड यंग यांनी स्पष्ट केले.
जैव तंत्रज्ञान क्षेत्रातले आश्वासक स्टार्टअप्स, दुग्धोत्पादन आणि शेती आधारित तंत्रज्ञान क्षेत्र यांच्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून भारत अमेरिका सहकार्यासाठी संपूर्णपणे सहकार्य मिळेल असे आश्वासन जितेंद्र सिंह यांनी दिले.
जागतिक आव्हानांवर मात करण्यासाठी मजबूत जागतिक नेतृत्वाचा बंध निर्माण करण्याच्या दिशेने भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांसाठी हा उत्तम काळ आहे असे जितेंद्र सिंह यांनी सांगितले. महत्त्वाच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी, अमेरिका,आपला नैसर्गिक सहकारी ( जगातील सर्वात जुन्या आणि सर्वात मोठ्या अशा लोकशाहीच्या) सहकार्यासाठी येईल अशी आशा व्यक्त करत सहकार्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही असेही मंत्री महोदयांनी स्पष्ट केले.
***
N.Chitale/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1916644)
Visitor Counter : 173