गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री, अमित शहा यांनी नवी दिल्ली इथे केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीरच्या सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी घेतली बैठक

Posted On: 13 APR 2023 10:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 एप्रिल 2023

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री, अमित शहा यांनी आज नवी दिल्ली इथे केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीरच्या सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, अजित डोवाल, जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल, मनोज सिन्हा, केंद्रीय गृह सचिव, संचालक (IB), संशोधन आणि विश्लेषण शाखा (RAW) चे प्रमुख, केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीर सरकारचे अधिकारी यांच्यासह भारत सरकारचे इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी सुरक्षा ग्रीडच्या कामकाजाचा आणि सुरक्षेशी संबंधित विविध पैलूंचा आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकार दहशतवादा विरोधात शून्य सहिष्णुतेसाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. अमित शाह यांनी एरिया डॉमिनेशन प्लान, झिरो टेरर प्लान, कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती, यूएपीएशी संबंधित प्रकरणे आणि सुरक्षेशी संबंधित इतर मुद्यांचाही आढावा घेतला. सुरक्षा संस्था आणि जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासनाने, सीमेपलीकडून होणारी घुसखोरी लक्षणीयरीत्या कमी करण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती सुधारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे गृहमंत्र्यांनी कौतुक केले, आणि नियमित पोलीस दक्षता यंत्रणा आणखी मजबूत करण्याची सूचना दिली. मे 2023 मध्ये श्रीनगर इथे होणाऱ्या G-20 बैठकीच्या तयारीचाही गृहमंत्र्यांनी आढावा घेतला, आणि सर्व यंत्रणांना कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समन्वयाने काम करण्याचे  निर्देश दिले.

 

 

 

S.Patil/R.Agashe/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1916382) Visitor Counter : 185