विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

तळागाळातील नवोन्मेषींची उद्योजकता, उत्पादन आणि बाजारपेठेच्या विकासाला मदत करण्यासाठी, राष्ट्रपती भवन इथे सुरु असलेल्या फेस्टिव्हल ऑफ इनोव्हेशन अँड आंत्रप्रूनरशिप (FINE) 2023 मध्ये तळागाळातील नवोन्मेषाला गती देणाऱ्या कार्यक्रमाची घोषणा

Posted On: 12 APR 2023 7:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 एप्रिल 2023

तळागाळातील नवोन्मेषींची उद्योजकता, उत्पादन आणि बाजारपेठेच्या विकासाला मदत करण्यासाठी, राष्ट्रपती भवन इथे सुरु असलेल्या फेस्टिव्हल ऑफ इनोव्हेशन अँड आंत्रप्रूनरशिप (FINE) 2023 मध्ये, तळागाळातील नवोन्मेषाला गती देणाऱ्या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे.

एनआयएफ जोपासना आणि उद्योजकता परिषद (NIFientreC), राष्ट्रीय नवोन्मेष प्रतिष्ठान(NIF)– इंडिया द्वारे आयोजित टीबीआय आणि पब्लिसिस सेपियंट या डिजिटल व्यवसाय परिवर्तन कंपनी यांच्या सहयोगाने 11 एप्रिल 2023 रोजी हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. या भागीदारीमुळे कृषी क्षेत्र आणि शेतीमधील आव्हाने सोडवण्यासाठी तळागाळातील नवोन्मेषाच्या नवकल्पनांचे व्यावसायिकीकरण व्हायला मदत होईल. 

या कार्यक्रमाच्या प्रायोगिक तंत्रज्ञानासाठी, तळागाळातील पाच वेगवेगळ्या नवोन्मेषांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये मिरपूड दळणारे यंत्र, कोळशावर चालणारे भाजी कापणी यंत्र, कडधान्य दळणारे लहान यंत्र, लवंग कळ्या वेगळ्या करणारे यंत्र, आणि अक्रोड सोलणारे यंत्र यांचा समावेश आहे.

या प्रायोगिक तंत्रज्ञानाच्या नवोन्मेषींना क्षमता विकास, फॅब्रिकेशन प्रयोगशाळांची उपलब्धता, जोखीम भांडवल आणि व्यावसायिकीकरण आणि नवोन्मेष बाजारपेठेसाठी सज्ज करण्यासाठी आवश्यक दीर्घकालीन पाठबळ यासारखे सुरुवातीपासून शेवटच्या टप्प्यापर्यंतचे सहाय्य प्रदान केले जाईल.

तळागाळातील नवोन्मेषी, असामान्य पारंपरिक ज्ञानधारक आणि देशभरातील विद्यार्थ्यांच्या तंत्रज्ञान विषयक कल्पना आणि नवोन्मेष, याची जोपासना आणि व्यावसायिकीकरण करण्यासाठी, 2015 मध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या (DST) अर्थसहाय्याने, एनआयएफ जोपासना आणि उद्योजकता परिषदेची स्थापना करण्यात आली. कार्यक्रमाची आयोजक एनआयएफ संस्था, ही भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची (DST) स्वायत्त संस्था आहे.

हा कार्यक्रम, संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसामान्य सभेने 2015 मध्ये मान्यता दिलेल्या शाश्वत विकास उद्दिष्टांसोबत  (SDG)  सुसंगत असून, लवचिक पायाभूत सुविधा निर्माण करणे, शाश्वत औद्योगिकीकरणाला प्रोत्साहन देणे आणि नवोन्मेषाला चालना देणे, हे त्याचे उद्दिष्ट आहे.

एनआयएफ जोपासना आणि उद्योजकता परिषद (NIFientreC), तळागाळातील नवोन्मेषींना विविध मार्गांनी प्रोत्साहन देत असूनसामाजिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही मार्गांच्या प्रसाराद्वारे त्यांचा स्वीकार करण्याचा मार्ग मोकळा करत आहे.   

 

 

 

 

S.Patil/R.Agashe/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1915996) Visitor Counter : 192


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu