संरक्षण मंत्रालय

अंदमान आणि निकोबार कमांड येथे ‘एक्स कवच’ या संयुक्त लष्करी सरावाचा समारोप

Posted On: 08 APR 2023 10:09PM by PIB Mumbai

 

अंदमान आणि निकोबार कमांडने (ANC) ‘ एक्स कवचया व्यापक स्तरावरील संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन केले ज्यामध्ये लष्कर, नौदल, हवाई दल आणि तटरक्षक दलाच्या युद्धसामग्रीचा समावेश होता. 23 फेब्रुवारी, 2023 रोजी सुरू झालेल्या या सरावाचा 7 एप्रिल 2023 रोजी समारोप झाला.

या सर्व दलांमध्ये युद्धविषयक क्षमतांचे आणि आदर्श परिचालन प्रकियांचा अतिशय चांगला ताळमेळ साधला जावा आणि या दलांमध्ये आंतरपरिचालनक्षमतेत वाढ व्हावी आणि समन्वय निर्माण व्हावा या उद्देशाने या सरावाचे आयोजन करण्यात आले होते. लष्कराच्या शत्रुजित ब्रिगेडचे भाग, संरक्षण दलांचा विशेष कारवाई विभाग (AFSOD), नौदलाची विशेष दले आणि अंदमान निकोबार कमांडच्या (ANC) जमीन आणि पाण्यावर परिचालनक्षम ऍम्फिबियसतुकड्यांनी या बहु-क्षेत्रीय सरावात सहभाग घेतला. यामध्ये ऍम्फिबियसलँडिंग, एयर लँडेड ऑपरेशन्स, हेलिबोर्न ऑपरेशन्स आणि मुख्य भूमीवरून अंदमान आणि निकोबारच्या अतिदूरवर असलेल्या बेटांवर अतिशय वेगाने विशेष दलांना तैनात करणे यांसारख्या सरावाचा समावेश होता.

एक्सरसाईज कवचने भारताच्या सागरी हिताचे रक्षण करण्यामध्ये आणि अंदमान आणि निकोबार बेटांचे संरक्षण करण्यामध्ये सशस्त्र दलांची क्षमता आणि सज्जता यांचे दर्शन घडवले. अतिशय गुंतागुंतीच्या आणि गतिशील वातावरणात यशस्वी संयुक्त सरावाच्या आयोजनाच्या माध्यमातून अंदमान निकोबार कमांडच्या विविध घटकांमध्ये असलेली व्यावसायिक वृत्ती आणि ताळमेळ यांचे प्रभावी दर्शन या सरावातून घडवण्यात आले. अतिशय तातडीने प्रतिसाद देत या दलांकडून प्रभावी पद्धतीने घडवण्यात आलेल्या आपल्या क्षमतांची अंदमान आणि निकोबारचे कमांडर इन चीफ लेफ्टनंट जनरल अजय सिंग यांनी पाहणी केली. त्यांनी या दलांची त्यांचे व्यावसायिक कौशल्य आणि यशस्वी मोहिमांबद्दल प्रशंसा केली. अशा प्रकारच्या सरावातून आपल्या प्रदेशात शांतता आणि सुरक्षा प्रस्थापित करून देश आपली संरक्षण क्षमता सातत्याने मजबूत करत आहे, असे ते म्हणाले.

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1914983) Visitor Counter : 180


Read this release in: English , Urdu , Hindi