उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी ईस्टरच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना दिल्या शुभेच्छा
Posted On:
08 APR 2023 3:17PM by PIB Mumbai
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी ईस्टरच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
उपराष्ट्रपतींच्या संदेशाचा मजकूर खालीलप्रमाणे आहे:
“ईस्टरच्या शुभ प्रसंगी मी सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो.
ईस्टरचा पवित्र दिन प्रभु येशू ख्रिस्तांच्या पुनरुत्थानाचे पर्व आहे. आजचा दिवस आपल्याला प्रेम, करुणा आणि क्षमा या गुणांचे महत्व पटवून देतो.
ईस्टरनिमित्त आपण सर्वजण एकत्र येऊन सलोखा आणि शांतता वृद्धींगत करत मानवतेच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेऊया.
***
N.Chitale/V.Yadav/Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1914910)