गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज हरिपूर संगीत विश्वविद्यालयाचा कोनशीला समारंभ ; उत्तर प्रदेशातील आझमगड येथील 4583 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे केले उद्घाटन आणि पायाभरणी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशातील प्रत्येक घरात नळाद्वारे  पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्याची सुविधा उपलब्ध, आझमगड येथे आज 4257 कोटी रुपये खर्चाच्या 1358 योजनांची सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 60% घरांमध्ये नळाद्वारे  पाणीपुरवठ्याची सोय केली आहे, आतापर्यंत 11.66 कोटी घरांना नळाने पाणीपुरवठा करण्याचे काम पूर्ण

Posted On: 07 APR 2023 10:24PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज हरिपूर संगीत विश्वविद्यालयाचा कोनशीला समारंभ पार पडला, तसेच शाह यांनी यावेळी उत्तर प्रदेशातील आझमगड येथील 4583 कोटी रुपये खर्चाच्या 117 विकास प्रकल्पांचे  उद्घाटन आणि पायाभरणी केली.यावेळी उपस्थितांना संबोधून केलेल्या भाषणात केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की पूर्वीच्या सरकारांच्या काळात संपूर्ण देशात आझमगड म्हणजे दहशतीचा गड  समजला जात असे. मात्र आज, आझमगडचा वारसा म्हणून प्रसिध्द असलेल्या हरिहर घराण्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाखाली येथे संगीत विद्यालयाची कोनशीला रचण्यात आली आहे.

अमित शाह पुढे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशातील प्रत्येक घरात नळाने पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्याची सुविधा पोहोचवली जात  आहे आणि आझमगड येथे आज 4257 कोटी रुपये खर्चाच्या 1358 योजना सुरु करण्यात आल्या आहेत. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 60% घरांमध्ये नळाने पाणी पोहोचवले आहे, आणि आता प्रत्येक सेकंदाला एका घराला नळाने पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. केंद्रीय मंत्री म्हणाले की, आतापर्यंत देशभरातील 11 कोटी 66 लाख घरांना नळाने पाणीपुरवठा करण्याचे काम पूर्ण झाले आहे. ते म्हणाले की आजपासून, उत्तर प्रदेशातील फ्लोराईडमुळे प्रभावित भागांमध्ये नळाने स्वच्छ पाण्याचा पुरवठा होईल याची सुनिश्चिती केली जात आहे.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेश हे राज्य विकासाचे प्रतिक म्हणून उदयाला आले आहे.

नोइडा आणि आझमगड येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळांचा विकास केला जात असून यामुळे उत्तर प्रदेश हे लखनौ, वाराणसी आणि कुशीनगर यांच्यासह पाच आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेले देशातील एकमेव राज्य ठरले आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी दिली.

***

N.Chitale/S.Chitnis/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1914733) Visitor Counter : 195


Read this release in: English , Urdu , Hindi , Manipuri