पर्यटन मंत्रालय

भारताला 2022 मध्ये 6.19 दशलक्ष परदेशी पर्यटकांनी दिली भेट, 2021 मध्ये याच कालावधीत 1.52 दशलक्ष परदेशी पर्यटकांनी दिली होती भेट

Posted On: 07 APR 2023 10:53AM by PIB Mumbai

 

2019 या कोरोना संकटापूर्वीच्या वर्षात भारतात 10.93 दशलक्ष परदेशी पर्यटकांचे आगमन (FTAs) झाले होते. पर्यटन उद्योगाने कोविड-19 साथीच्या काळानंतर पुनरुज्जीवनाची चांगली चिन्हे दर्शविली आहेत. इमिग्रेशन ब्युरोकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, 2022 मध्ये भारताला 6.19 दशलक्ष परदेशी पर्यटकांनी (FTAs) भेट दिली. 2021 मध्ये याच कालावधीत 1.52 दशलक्ष पर्यटक भारत भेटीवर आले होते.

पर्यटकांना भारत भेटीचा समृद्ध अनुभव प्रदान करण्याच्या उद्देशाने देशातील पर्यटन उद्योगासंबंधित पायाभूत सुविधांच्या विकासासाठी, भारत सरकारचे पर्यटन मंत्रालय आपल्या स्वदेश दर्शन, प्रसाद आणि केंद्रीय संस्थाना सहाय्य या योजनांतर्गतराज्य सरकारे /केंद्रशासित प्रदेश /केंद्रीय संस्थांना नियोजित कार्यक्रमानुसार टप्प्याटप्प्याने केंद्रीय आर्थिक सहाय्य प्रदान करते.

पर्यटन मंत्रालयाने टोल फ्री क्रमांक 1800111363 किंवा 1363 या शॉर्ट कोडवर 24x7 बहु-भाषिक पर्यटक माहिती हेल्पलाइन सुरू केली आहे. या हेल्पलाईन क्रमांकावर 10 आंतरराष्ट्रीय भाषांसह (जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश, इटालियन, पोर्तुगीज, रशियन, चीनी,जपानी, कोरियन, अरबी) हिंदी आणि इंग्रजी या 12 भाषांमध्ये देशी आणि परदेशी पर्यटकांना भारतातील पर्यटनासंबंधी माहिती प्रदान केली जाते. तसेच भारतात प्रवास करताना संकटात सापडलेल्या पर्यटकांना योग्य मार्गदर्शन देखील केले जाते.

2021 आणि 2022 या वर्षासाठी भारतातील पर्यटनाद्वारे परकीय चलन कमाईचे (एफईई) तपशील (कोटी रुपयांमध्ये) खाली दिले आहेत:

Year

FEEs through tourism in India (in Rs. crore)

2021

65,070

2022 *

1,34,543

*तात्पुरते अंदाज

देशभरातील 55 ठिकाणी G20 बैठका होत आहेत. G20 बैठकीसाठी या शहरांमधील पायाभूत सुविधा वाढवल्या जात आहेत आणि अद्ययावत केल्या जात आहेत.

या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पर्यटनावर अधिक भर दिला जात आहे. बैठक स्थळाच्या जवळपासच्या पर्यटन स्थळांवर प्रतिनिधींच्या सहलीचे आयोजनही केले जाते. या स्थळांना भेट देणारे G20 प्रतिनिधी त्यांच्या देशात भारताचे पर्यटन दूत बनून परत जातील यासाठी प्रयत्न केले जात आहेत. महत्त्वाची पर्यटन स्थळे आणि सुविधा यांच्या श्रेणीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुधारणा केल्या जात आहेत.

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1914643) Visitor Counter : 201


Read this release in: Tamil , English , Urdu