शिक्षण मंत्रालय
शालेय शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याच्या मसुद्यावर शिक्षण मंत्रालयाने मागवल्या सूचना
Posted On:
06 APR 2023 9:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 एप्रिल 2023
शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षणासह भारतातील संपूर्ण शिक्षण प्रणालीमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 चे उद्दिष्ट आहे. शालेय शिक्षण हे मुलांच्या जीवनाचा पाया घालण्याचे काम करते. शालेय शिक्षणाच्या संदर्भात, NEP 2020 ने 10+2 संरचनेच्या ऐवजी 5+3+3+4 संरचना सुरू करण्याची शिफारस केली आहे. यात पायाभूत, पूर्वतयारी, मध्यम आणि माध्यमिक या विविध टप्प्यांवर अभ्यासक्रम आणि शैक्षणिक बदल सुचवणाऱ्या विकासात्मक दृष्टीकोनांवर भर दिला आहे- . NEP 2020 संस्कृतीची उत्तम पायाभरणी, समानता आणि सर्वसमावेशकता, बहुभाषिकता, अनुभवात्मक शिक्षण, शैक्षणिक सामग्रीचा भार कमी करणे, अभ्यासक्रमात कला आणि क्रीडा यांचे एकत्रीकरण अशा सक्षमतेवर आधारित शिक्षणावर लक्ष केंद्रित करते.
NEP 2020 चा पाठपुरावा म्हणून, चार राष्ट्रीय अभ्यासक्रम संरचना विकसित करणे, उदा., शालेय शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम संरचना( NCF), प्रारंभिक बाल्यावस्थेतली काळजी आणि शिक्षणासाठी NCF, शिक्षकांच्या शिक्षणासाठी NCF आणि प्रौढ शिक्षणासाठी NCF सुरू करण्यात आले आहेत. या सर्व NCF च्या विकासासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सुकाणू समितीची स्थापना केली होती.
यासाठीच्या चर्चेच्या सहभागी प्रक्रियेतून जात असताना, प्रारंभिक बाल्यावस्थेतली काळजी आणि शिक्षणासाठी(ECCE),शालेय शिक्षण, शिक्षकांचे शिक्षण आणि प्रौढ शिक्षण क्षेत्रातील राष्ट्रीय अभ्यासक्रम संरचनेसाठी शिक्षक, पालक, विद्यार्थी, शैक्षणिक संस्था, नवसाक्षर आणि निरक्षर,विषय तज्ञ, विद्वान, बालसंगोपन कर्मचारी अशा विविध भागधारकांकडून त्यांचे अभिप्राय मागवले गेले. यावर समोरासमोर तसेच डिजिटल पद्धतीने व्यापक सार्वजनिक सल्लामसलत करण्यात आली. विचारविनिमय आणि चर्चेच्या या प्रक्रियेत, 500 हून अधिक जिल्हास्तरीय आढावा बैठक आणि विविध मंत्रालयाकडून 50 हून अधिक सल्लामसलत आढावा बैठका घेण्यात आल्या. यात समोरासमोर आणि डिजिटल पद्धतीने 8000 हून अधिक भागधारक सहभागी झाले होते.
यासाठी केलेल्या मोबाइल ॲप सर्वेक्षणात सुमारे 1,50,000 भागधारकांकडून अभिप्राय प्राप्त झाले आहेत. ऑगस्ट 2022 मध्ये शिक्षण मंत्रालयाने सुरू केलेल्या नागरिक केंद्रित सर्वेक्षणाला 12,00,000 हून अधिक भागधारक अभिव्यक्त झाले आहेत. ECCE, शालेय शिक्षण, शिक्षक शिक्षण आणि प्रौढ शिक्षण या सर्व क्षेत्रांमध्ये सहभागी लोकांनी मते व्यक्त केली आहेत. विविध स्तरांवरील लोकांनी व्यक्त केलेल्या मतांमधून सर्व क्षेत्रांमधून NEP 2020 च्या शिफारशींचे समर्थन दिसून आले.
या मतांची दखल घेऊन, 20 ऑक्टोबर 2022 रोजी शिक्षण मंत्रालयाने पायाभूत टप्प्यासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याचे नियोजन केले आणि त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात पण केली. या पायाभूत स्तरावरील राष्ट्रीय अभ्यासक्रम संरचना म्हणजेच NCF-FS च्या अंमलबजावणीसाठी शालेय शिक्षणासाठीचा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा - पूर्व मसुदा देखील तयार आहे. शालेय शिक्षणाच्या विविध टप्प्यांवर विद्यार्थ्यांच्या वैविध्यपूर्ण गरजा, अनेक अध्यापनशास्त्रीय दृष्टिकोन, अध्ययन-शैक्षणिक साहित्य या सर्व बाबी लक्षात घेता विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षक अध्यापक, तज्ञ, अभ्यासक आणि विविध विभागातील व्यावसायिक यांच्याकडून अभिप्राय घेणे महत्त्वाचे वाटते. या NCF-शालेय शिक्षण (SE) च्या शिफारसी साठी तुमचा अभिप्राय देताना, हे लक्षात घेतले पाहिजे की हा NCF-SE चा पूर्व मसुदा आहे, ज्यावर राष्ट्रीय सुकाणू समितीमध्ये अनेक फेऱ्यांची चर्चा होणे आवश्यक आहे. विविध भागधारकांकडून मिळालेल्या अभिप्रायांमुळे NSC ला ही संरचना प्रस्तावित करत असलेल्या विविध पद्धती आणि दृष्टिकोनांकडे गंभीरपणे पाहण्यास मदत करेल.
शालेय शिक्षणाचा टप्पा, अभ्यासक्रमाचे क्षेत्र, शालेय प्रशासन, मूल्यमापन हे घटक नमूद करून अभिप्राय मागविला जातो.
तुम्ही तुमचा अभिप्राय खालील ईमेल पत्त्यांवर पाठवू शकता- ncf.ncert@ciet.nic.in
कागदपत्रांसाठीची लिंक: https://ncf.ncert.gov.in/webadmin/assets/b27f04eb-65af-467f-af12-105275251546
* * *
S.Patil/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1914464)
Visitor Counter : 3463