दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

ट्रायने “अंतराळ - आधारित संप्रेषण सेवांसाठी स्पेक्ट्रम असाइनमेंट” या विषयावर सल्लापत्र केले जारी

Posted On: 06 APR 2023 8:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 एप्रिल 2023

 

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) आज "अंतराळ - आधारित संप्रेषण सेवांसाठी स्पेक्ट्रम असाइनमेंट" या विषयावर एक सल्लापत्र जारी केले आहे.

यापूर्वी, दूरसंचार विभागाने (DoT), 13.09.2021 च्या आपल्या पत्राद्वारे, "इंटरनॅशनल मोबाईल टेलिकम्युनिकेशन्स (IMT) / 5G साठी ओळखल्या गेलेल्या फ्रिक्वेन्सीमध्ये स्पेक्ट्रमचा लिलाव" याबाबत शिफारसी देण्याची ट्रायला विनंती केली होती. या पत्राद्वारे, ट्रायला इतर गोष्टींबरोबरच, योग्य फ्रिक्वेन्सी बँड, बँड योजना, ब्लॉक आकार, लागू राखीव किंमत, लिलाव होणार्‍या स्पेक्ट्रमचे प्रमाण आणि अंतराळ - आधारित संप्रेषण सेवांसाठी स्पेक्ट्रमच्या लिलावा संबंधित अटींबाबत शिफारसी प्रदान करण्याची विनंती करण्यात आली होती. 

या संदर्भात, ट्रायने दिनांक 27.09.2021 आणि 23.11.2021 च्या पत्रांद्वारे, दूरसंचार विभागाकडून अंतराळ-आधारित संप्रेषण सेवांच्या संदर्भात माहिती/ स्पष्टीकरण मागितले होते. प्रत्युत्तरादाखल, दूरसंचार विभागाने दिनांक 27.11.2021 च्या पत्राद्वारे, इतर गोष्टींबरोबरच, ट्रायने मागवलेल्या अंतराळ - आधारित संप्रेषण सेवांच्या संदर्भात माहिती देण्यास काही वेळ लागेल असे कळवले; म्हणून, 5G रोल - आउटमध्ये विलंब टाळण्यासाठी, दिनांक 13.09.2021 आणि 23.09.2021 च्या विभागाच्या पत्राच्या संदर्भानुसार ट्राय अंतराळ - आधारित संप्रेषण सेवा वगळता इतर समस्यांवर सल्लामसलत/शिफारशी घेऊन पुढे जाऊ शकते असे दूरसंचार विभागाने कळवले होते. माहिती मिळाल्यानंतर दूरसंचार विभागाकडून अंतराळ - आधारित दळणवळण सेवांशी संबंधित समस्या स्वतंत्रपणे विचारात घेतल्या जाऊ शकतात, असेही दूरसंचार विभागाने नमूद केले आहे. त्यानंतर, ट्रायने 11.04.2022 रोजी ‘आयएमटी /5 जी साठी निवडल्या गेलेल्या फ्रिक्वेन्सी बँड्समधील स्पेक्ट्रमच्या लिलावाबाबत’ सरकारला आपल्या शिफारसी दिल्या.

त्यानंतर, दूरसंचार विभागाने दिनांक 16.08.2022 च्या पत्राद्वारे ट्रायने दिनांक 27.09.2021 आणि 23.11.2021 च्या पत्रांद्वारे मागणी केल्याप्रमाणे अंतराळ - आधारित संप्रेषण सेवांच्या संदर्भात माहिती प्रदान केली. आवश्यक माहिती प्रदान करताना, दूरसंचार विभागाने खाली नमूद केल्याप्रमाणे काही अतिरिक्त मुद्द्यांवर शिफारसी देण्याची ट्रायला विनंती केली आहे:

  1. ट्राय सल्लामसलत करून, अंतराळ - आधारित संप्रेषण सेवांच्या मागणीचे मूल्यांकन करू शकते आणि त्यानुसार लिलावासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक बँडमध्ये स्पेक्ट्रमच्या प्रमाणात शिफारसी देऊ शकते.
  2. स्पेस स्पेक्ट्रमचा विशेष आधारावर लिलाव करण्याची कल्पना आहे. ट्राय बहुविध सेवा परवानाधारकांमध्ये लिलाव केलेला स्पेक्ट्रम सामायिक करण्याची व्यवहार्यता आणि प्रक्रिया शोधू शकते. उपग्रह नेटवर्क आणि स्थलीय नेटवर्क या दरम्यान लिलाव केलेल्या फ्रिक्वेन्सी बँडच्या सामायिकरणावर देखील ट्राय शिफारसी देऊ शकते. यासोबतच, सामायिकरणाचे निकष, सामायिकरण आणि सहअस्तित्वासाठी योग्य हस्तक्षेप कमी करण्याचे तंत्र याबाबतही शिफारसी देऊ शकते. 
  3. फ्रिक्वेन्सी बँड 27.5-28.5 GHz (IMT साठी निर्धारित) आणि 28.5-29.5 GHz (कॅप्टिव्ह बिगर-सार्वजनिक नेटवर्कसाठी अभ्यास केला जात आहे), भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय,TRAI) लिलाव प्रक्रीये दरम्यान फ्रिक्वेन्सी बँड सामायिक करण्यासाठीच्या यंत्रणेची शिफारस करू शकेल, ज्यामध्ये IMT/CNPN आणि उपग्रह-आधारित सेवा (वापरकर्ता टर्मिनल आणि गेटवे) लवचिक पद्धतीने प्रदान केल्या जाऊ शकतात.
  4. सेवा प्रदात्यांना वापरकर्ता लिंक तसेच फीडर लिंकमध्ये स्पेक्ट्रमची आवश्यकता भासेल, त्यामुळे, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण, भागधारकांकडून घेतलेल्या माहितीच्या आधारे योग्य लिलाव पद्धतीची शिफारस करेल, जेणेकरून यशस्वी बोली लावणाऱ्याला वापरकर्ता लिंकसाठी (आयएमटी बरोबर लवचिक स्वरूपात शेअर केलेले) तसेच फीडर लिंक साठी स्पेक्ट्रम उपलब्ध होईल.  
  5. या व्यतिरिक्त, या फ्रिक्वेन्सी बँडमध्ये स्पेक्ट्रम लिलावाच्या दृष्टीने योग्य समजल्या जाणार्‍या इतर कोणत्याही शिफारसी द्याव्यात अशी विनंती ट्राय ला करण्यात आली असून, यामध्ये अद्ययावत ITU-R रेडिओ नियमांच्या संबंधित तरतुदींमध्ये नमूद केल्यानुसार नियामक/तांत्रिक आवश्यकतांचा समावेश आहे.

त्या अनुषंगाने, ट्राय  ने, 19.10.2022 रोजी दूरसंचार विभागाला पत्र लिहून, अधिक माहिती/स्पष्टीकरण मागितले आहे. यामध्ये कोणत्या प्रकारच्या परवानाकृत सेवांना, स्पेस-आधारित दळणवळणासाठी स्पेक्ट्रम लिलावाद्वारे मंजुरी देण्याची योजना आहे, हे दूरसंचार विभागाने इतर गोष्टींबरोबर स्पष्ट करावे, अशी विनंती करण्यात आली होती. त्यानंतर दूरसंचार विभागाने दिनांक 16.12.2022 च्या पत्राद्वारे उत्तर दिले होते, की ट्राय, प्रत्येक स्पेस-आधारित संप्रेषण सेवेसाठी तपशीलवार तपासणीनंतर योग्य शिफारसी देऊ शकेल. त्यामुळे, सध्याच्या सल्लामसलत अहवालात ट्रायने दूरसंचार विभागाने सूचित केल्यानुसार स्पेस-आधारित संप्रेषण सेवांसाठी संबंधित सर्व स्पेक्ट्रम बँड्सचा विचार केला आहे.

या संदर्भात, ट्राय च्या (www.trai.gov.in) या वेबसाइटवर सल्लामसलत पत्रकाद्वारे, “स्पेस-आधारित दूरसंचार सेवांसाठी स्पेक्ट्रमची नियुक्ती” या विषयावर भागधारकांकडून अभिप्राय मागवण्यात आला आहे. या सल्लामसलत पत्रकामध्ये, भागधारकांनी विचारात घ्यावेत, यासाठी काही मुद्दे मांडण्यात आले आहेत. सल्लामसलत पत्रकात उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर 4 मे 2023 पर्यंत भागधारकांकडून लिखित टिप्पण्या आणि 18 मे 2023 पर्यंत प्रति-टिप्पण्या मागविण्यात आल्या आहेत.

टिप्पण्या/प्रति-टिप्पण्या, शक्यतो इलेक्ट्रॉनिक स्वरूपात advmn@trai.gov.in वर पाठवाव्यात. कोणतेही स्पष्टीकरण/माहितीसाठी, अखिलेश कुमार त्रिवेदी, सल्लागार (नेटवर्क, स्पेक्ट्रम आणि परवाना), भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) यांच्याशी दूरध्वनी क्रमांक +91-11-23210481 वर संपर्क साधावा.

 

* * *

S.Patil/S.Mukhedkar/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1914430) Visitor Counter : 156


Read this release in: English , Urdu , Hindi