नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

‘राष्ट्रीय सागरी दिना’निमित्त केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सागरी जनजागृती वॉकॅथॉनला हिरवा झेंडा दाखवला


सोनोवाल यांनी नाविक, बंदर कामगार आणि सागरी क्षेत्राशी संबंधित प्रत्येकाला अभिवादन केले

अमृत काळात आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी नौवहन नवीन संधी खुल्या करेल : सर्बानंद सोनोवाल

बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्र्यांनी महिला नाविकांनी केलेल्या अतुलनीय योगदानाची केली प्रशंसा

Posted On: 05 APR 2023 8:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 एप्रिल 2023

 

60 व्या राष्ट्रीय सागरी दिनानिमित्त, केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग आणि आयुष मंत्री  सर्बानंद सोनोवाल यांनी आज  ‘सागरी जनजागृती वॉकॅथॉनला ' हिरवा झेंडा दाखवला. यावेळी बंदरे, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद वाय  नाईक, बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाचे सचिव  सुधांश पंत, आयएएस , राष्ट्रीय नौवहन मंडळाचे अध्यक्ष संजीव रंजन, आयएएस , बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव राजेश कुमार सिन्हा, आयएएस ,  कॅप्टन राजेंद्र पोसवाल, नॉटिकल सर्वेअर  आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमादरम्यान, सर्बानंद सोनोवाल यांनी लोकांना शुभेच्छा दिल्या आणि नाविक, बंदर कामगार आणि सागरी क्षेत्राशी संबंधित सर्व लोकांना त्यांच्या दृढनिश्चयासाठी आणि कठोर परिश्रमाबद्दल अभिवादन केले.

भारताच्या आर्थिक विकासासाठी सागरी क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित करताना सर्बानंद सोनोवाल म्हणाले, “नौवहन  ही राष्ट्राच्या समृद्धीची जीवनरेखा आणि  मार्ग आहे. हा पहिला राष्ट्रीय सागरी दिवस आहे, जो आपण अमृत काळात  साजरा करत आहोत. भारताच्या अमृत काळात , आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचे  नेतृत्व करण्यासाठी नौवहन नवीन संधी खुल्या करेल.”

“युवकांसाठी उत्कृष्ट रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धडाडीच्या नेतृत्वाखाली अमृत काळाचे उद्दिष्ट आहे. नौवहन क्षेत्राला जलद गतीने वाढ नोंदवणारे क्षेत्र बनवण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील, जेणेकरून सागरी पायाभूत सुविधांमध्ये भारत जागतिक नेतृत्व करेल  तसेच सागरी अर्थव्यवस्थेतील आघाडीचा देश  बनू शकेल,” असे  सोनोवाल म्हणाले.

“महिला नाविकही सागरी क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल मी आभारी आहे,” असे ते म्हणाले.

5 एप्रिल 1919 रोजी, भारतीय कंपनी सिंधिया स्टीम नेव्हिगेशन कंपनी लिमिटेडचे एस. एस. लॉयल्टी नावाचे जहाज प्रथमच भारतातून लंडनला व्यापारासाठी गेले. त्याच्या स्मरणार्थ, बंदरे, नौवहन  आणि जलमार्ग मंत्रालय दरवर्षी  5 एप्रिल हा दिवस राष्ट्रीय सागरी दिन म्हणून साजरा करते.

राष्ट्रीय सागरी दिन हा भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये सागरी व्यापाराची महत्त्वाची भूमिका  आणि जागतिक व्यापारातील त्याचे धोरणात्मक स्थान याला समर्पित आहे.

 

* * *

S.Patil/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1914072) Visitor Counter : 195