पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पर्यावरणीय परवानगीची प्रक्रिया स्वयंचलित पद्धतीने करणाऱ्या परिवेश पोर्टलमुळे परवानगीसाठी लागणाऱ्या एकूण वेळेत घट

प्रविष्टि तिथि: 03 APR 2023 11:09PM by PIB Mumbai

पर्यावरणीय परवानगीची कामे प्रलंबित राहू नये म्हणून राज्य सरकारच्या विनंतीवरून तीन SEAC ची स्थापना करण्यात आली आहे.  या तीनपैकी एक SEAC केवळ राज्यातील इमारत आणि बांधकाम संबंधित प्रकल्पांसाठीच आहे.

मंत्रालयाने, पर्यावरणीय परवानगी प्रक्रियेला गती देण्यासाठी,ऑनलाइन एक खिडकी "परिवेश पोर्टल" सुरू केले आहे. यात अर्ज सादर करणे, उद्देश निश्चिती आणि परवानग्यांसाठी इतिवृत्त तयार करणे यापासून पर्यावरणीय परवानगीची संपूर्ण प्रक्रिया स्वयंचलित पद्धतीने होते. पर्यावरण संरक्षणाच्या नियमांबाबत कोणतीही तडजोड न करता पर्यावरणीय परवानगीची प्रक्रिया पारदर्शक आणि सुलभ राखण्यासाठी धोरणे आणि नियमांमध्ये सुधारणा करण्याकरता विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. सरकारच्या विविध पावलांमुळे पर्यावरणीय परवानगीसाठी लागणारा एकूण वेळ सातत्याने कमी होत आहे.

पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

***

UmeshU/VinayakG/DY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1913495) आगंतुक पटल : 198
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu