सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

शांघाय सहकार्य संघटना सदस्य देशांच्या सांस्कृतिक मंत्र्यांच्या 20 व्या अधिवेशनाचे आभासी पद्धतीने आयोजन


शांघाय संघटनेतील राष्ट्रांच्या परस्पर-सांस्कृतिक संबंधांचे आणि सामायिक इतिहासाचे नूतनीकरण करण्यासाठी भगवान बुद्धांनी शिकवण दिलेली प्रेम आणि अहिंसेची मूल्ये अंगिकारण्याची आवश्यकता : जी. किशन रेड्डी

Posted On: 03 APR 2023 7:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 एप्रिल 2023

 

संस्कृती  मंत्री  जी. किशन रेड्डी यांनी आज -  3 एप्रिल 2023 रोजी दूरदृश्‍य प्रणालीद्वारे शांघाय सहकार्य संघटना  (एससीओ) सदस्य देशांच्या सांस्कृतिक मंत्र्यांच्या बैठकीच्या 20 व्या सत्राचे यजमानपद भूषविले.

या सत्रामध्‍ये कझाकिस्तान, चीन, किर्गिस्तान, पाकिस्तान, रशिया, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांचे  सांस्कृतिक मंत्री सहभागी झाले होते. ‘एससीओ’ च्या सदस्य राष्ट्रांच्या सांस्कृतिक मंत्र्यांनी एससीओच्या चौकटीत सांस्कृतिक क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी एससीओ सदस्य राष्ट्रांच्या सरकारांमधील सांस्कृतिक आणि अशा इतर करारांच्या कक्षेत सांस्कृतिक सहकार्य वाढवण्याबाबत आपले मत व्यक्त केले.

सत्राच्या  प्रारंभिक भाषणात सांस्कृतिक मंत्री  जी.  किशन रेड्डी यांनी एससीओ  राष्ट्रांमधील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांचा उल्लेख केला. त्यांनी परस्पर आदर, विविधता आणि सर्वसमावेशकतेद्वारे शांततापूर्ण सहअस्तित्वाचा प्रसार करण्यासाठी सांस्कृतिक सहयोग आणि संवादाचे महत्त्व सांगितले. मंत्री रेड्डी यांनी  याप्रसंगी एससीओ देशांच्या सामायिक बौद्ध वारशावर विशेष तयार करण्‍यात आलेल्या    डिजिटल प्रदर्शनाचा प्रारंभ केला.

एससीओ अध्यक्षपदासाठी  भारताने   'सिक्युअर म्हणजेच - सुरक्षा, आर्थिक सहकार्य, संपर्क यंत्रणा, एकता, प्रादेशिक एकात्मता आणि  सार्वभौमत्वाचा आदर आणि पर्यावरण' यांना  संकल्पनेच्या केंद्रस्थानी ठेवले आहे. या  संस्कृतीमध्‍येच  सर्वांना एकत्रित बांधून ठेवण्‍याची  शक्ती आहे, त्यामुळे संघटनेचे लक्ष्य साध्य करण्यासाठी तिचेही  योगदान आहे.

बैठकीच्या अखेरीस  एससीओच्या सदस्य राष्ट्रांच्या सर्व सांस्कृतिक मंत्र्यांनी राजशिष्‍टाचारानुसार संकल्पनेचा  स्वीकार करून त्यावर स्वाक्षरी केली.

 

* * *

N.Chitale/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1913431) Visitor Counter : 167


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu