नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

धोरणात्मक यंत्रणा, हायड्रोजन प्रमाणीकरणासाठी समान नियमावली आणि देशांदरम्यान सहयोग प्रस्थापित करण्यासाठी नियामक आराखडा या बाबी हरित हायड्रोजन परिसंस्थेला गती देऊ शकतात: नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय सचिव बी.एस. भल्ला

Posted On: 02 APR 2023 7:12PM by PIB Mumbai

 

नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने (MNRE) उर्जा संक्रमण कार्यकारी गटाच्या दुसऱ्या बैठकीबरोबरच, "ग्रीन हायड्रोजन - ॲडव्हान्सिंग नेट-झिरो पाथवेज" या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हरित हायड्रोजनच्या कमी करणे कठीण असलेल्या  क्षेत्राचे डीकार्बोनाइझिंग आणि जी 20 राष्ट्रांचे निव्वळ-शून्य उद्दिष्टे साध्य करण्यात हरित हायड्रोजन महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल असा अंदाज आहे.

सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SECI) आणि इंटरनॅशनल सोलर अलायन्स (ISA) यांच्या सहकार्याने आणि नॉलेज पार्टनर म्हणून वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडियाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय संशोधन संस्था, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी , नियामक संस्था आणि इतर प्रमुख हितसंबंधी गटांचा सक्रिय सहभाग दिसून आला. हरित हायड्रोजनच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी आणि जी 20 राष्ट्रांमधील सहकार्याला चालना देण्यासाठी धोरण, नियामक आणि आर्थिक रचना या मुद्यांवर ही चर्चा केंद्रित होती. या कार्यक्रमात एक प्रदर्शन देखील भरवण्यात आले होते. या प्रदर्शनात भारतातील पहिला H2 अंतर्गत ज्वलन इंजिन ट्रक प्रदर्शित करण्यात आला होता.

देशांदरम्यान सहयोग प्रस्थापित करण्याबरोबरच धोरणात्मक यंत्रणा आणि नियामक आराखडा तयार केल्याने हरित हायड्रोजन परिसंस्थेला गती मिळू शकते, असे मत नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव भूपिंदर सिंग भल्ला यांनी उद्घाटन सत्रातील आपल्या प्रमुख भाषणात व्यक्त केले. जागतिक हायड्रोजन व्यापार सक्षम करण्यासाठी हायड्रोजन प्रमाणीकरणासाठी एक समान आराखड्यावर एकमत विकसित करणे अत्यंत महत्वाचे आहे, असेही ते म्हणाले.

***

S.Kane/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1913145) Visitor Counter : 205


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu