संरक्षण मंत्रालय

व्हाईस ॲडमिरल संजय जसजित सिंह, एव्हीएसएम, एनएम , यांनी नौदलाचे उपप्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला.

Posted On: 02 APR 2023 3:46PM by PIB Mumbai

व्हाइस ॲडमिरल संजय जसजित सिंग, AVSM, NM यांनी 01 एप्रिल 2023 रोजी नौदल उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. व्हाइस ॲडमिरल संजय जसजित सिंग यांनी 02 एप्रिल 23 रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे शूरवीरांना आदरांजली वाहिली आणि मानवंदना स्वीकारली.

व्हाइस ॲडमिरल संजय जसजित सिंग हे पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे पदवीधर आहेत. त्यांना 1986 मध्ये भारतीय नौदलाच्या कार्यकारी शाखेत नियुक्त करण्यात आले होते. आपल्या 37 वर्षांच्या कारकिर्दीत, त्यांनी भारतीय नौदलाच्या बहुतेक सर्व श्रेणीतील जहाजांवर काम केले आहे तसेच सहाय्यक नौदल प्रमुख (CSNCO), फ्लॅग ऑफिसर सी ट्रेनिंग, फ्लॅग ऑफिसर कमांडिंग वेस्टर्न फ्लीट, कमांडंट नेव्हल वॉर कॉलेज आणि कंट्रोलर कार्मिक सेवा यासह अनेक कमांड, प्रशिक्षण आणि कर्मचारीपदी काम केले. नौदल उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी ते एकात्मिक संरक्षण कर्मचारी (ऑपरेशन्स) पदी उपप्रमुख होते.

त्यांनी मद्रास विद्यापीठातून संरक्षण आणि धोरणात्मक अभ्यासात एम एससी आणि एमफिल तर लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून संरक्षण अभ्यासात एम ए आणि मुंबई विद्यापीठातून इतिहास या विषयात एम ए, राज्यशास्त्रात एमफिल आणि कलेत पी एचडी केली आहे. त्‍यांच्‍या विशिष्‍ट सेवेची दखल घेत, व्हाइस ॲडमिरल संजय जसजित सिंग यांना 2009 मध्‍ये नौसेना पदक आणि 2020 मध्‍ये अति विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले आहे.

***

S.Kane/S.Mukhedkar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1913094) Visitor Counter : 247


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil