ऊर्जा मंत्रालय
एनटीपीसी ने आर्थिक वर्ष 2023 मध्ये 10.80% च्या वाढीसह आतापर्यंतची सर्वाधिक 400 बी यु वीज निर्मिती नोंदवली
Posted On:
31 MAR 2023 5:16PM by PIB Mumbai
एनटीपीसी लिमिटेड, राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ या भारतातील सर्वात मोठ्या एकात्मिक ऊर्जा निर्मिती कंपनीने आर्थिक वर्ष 2023 मध्ये आतापर्यंतची सर्वाधिक 400 बी यु वीजनिर्मिती नोंदवली आहे. वीजनिर्मितीच्या मागील वर्षीच्या तुलनेत यात 10.80% वाढ झाली आहे.
एनटीपीसी ने 23.2 दशलक्ष मेट्रिक टन (एमएमटी) कोळसा उत्पादनासह आपल्या मालकीच्या खाणींमधून कोळसा उत्पादनातही वाढीव उत्पादन सुरू ठेवले असून मागील वर्षाच्या तुलनेत 65% पेक्षा जास्त वाढ नोंदवली आहे. एनटीपीसी ने कोळसा खाणींमधून कोळसा उत्पादन वाढवण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. उच्च-क्षमतेच्या डंपरचा वापर तसेच उत्खनन करणार्यांच्या सध्याच्या फ्लीटच्या आकारात वाढ झाल्यामुळे कार्यरत खाणींना उत्पादन वाढवण्यात यश आले आहे.
एनटीपीसी ने देशाची सेवा करण्याच्या आणि देशाच्या कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उद्दिष्टांना समर्थन देण्यासाठी 2032 पर्यंत नवीकरणीय उर्जेद्वारे आपली निम्मी स्थापित क्षमता गाठण्याचे महत्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे. वित्तीय वर्ष 2023 मध्ये कंपनीने बिगर जीवाश्म पोर्टफोलिओमध्ये 24.24% ची वाढ नोंदवली आहे.
एनटीपीसी समूहाची स्थापित क्षमता 71594 मेगावॅट आहे.
***
N.Chitale/S.Mukhedkae/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1912650)
Visitor Counter : 161