ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
घरगुती वापराच्या वस्तूंच्या खर्चाचा हिशेब कोलमडू नये यासाठी ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिवांचे किरकोळ विक्रेत्यांना निर्देश
Posted On:
31 MAR 2023 6:22PM by PIB Mumbai
भाववाढीमुळे घरांमध्ये डाळींच्या वापरावर परिणाम होणार नाही अशाप्रकारे रिटेल मार्जीन ठेवण्याच्या सूचना ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी एका बैठकीत किरकोळ विक्रेत्यांना केल्या. त्यांनी आज नवी दिल्लीत भारतीय किरकोळ विक्रेते संघटना (आरएआय ) आणि प्रमुख संघटित किरकोळ विक्रेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत सचिवांनी त्यांना डाळी, विशेषत: तूर डाळीच्यासंदर्भात रिटेल मार्जीन अवाजवी ठेवली जाणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश दिले.
या बैठकीत किरकोळ उद्योगातील कंपन्यांनी सरकारला पूर्ण सहकार्य करण्याची वचनबद्धता व्यक्त केली आणि डाळींच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही दिली.
भारतीय किरकोळ विक्रेते संघटना आणि प्रमुख संघटित किरकोळ विक्रेत्यांसोबतची आजची बैठक म्हणजे ग्राहकांना किफायतशीर दरात डाळींची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठीच्या या विभागाच्या बैठकांच्या मालिकेचा एक भाग होती. .
***
N.Chitale/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1912621)
Visitor Counter : 198