ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

केंद्र सरकारने डाळींच्या साठ्यावर लक्ष ठेवण्याची मोहीम केली अधिक तीव्र


नियमित पारदर्शक पद्धतीने उपलब्ध साठा घोषित करण्याचे केंद्र सरकारचे डाळींच्या आयातदारांना निर्देश

स्टॉक डिक्लेरेशन पोर्टलमध्ये नोंदणीकृत संस्थांची संख्या वाढवण्यासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी सर्व स्रोतांचा वापर करण्याचे केले आवाहन

Posted On: 29 MAR 2023 6:37PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 मार्च 2023

 

ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी प्रमुख डाळी आयातदारांना त्यांच्याकडील उपलब्ध सर्व साठा नियमितपणे पारदर्शक पद्धतीने घोषित केला जाईल याची खातरजमा  करण्याचे निर्देश दिले. तसेच देशांतर्गत बाजारात डाळींच्या उपलब्धतेत अडथळा निर्माण होईल असा  कोणताही साठा रोखून ठेवू नये, अशी सूचनाही करण्यात आली आहे.

दरम्यान, अतिरिक्त  सचिव  निधी खरे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आज सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसोबत बैठक घेतली, ज्यामध्ये त्यांना FSSAI परवानाधारक,एपीएमसी  नोंदणीकृत व्यापारी, डाळींचे जीएसटी नोंदणीकृत व्यापारी यांच्यासह स्टॉक डिक्लेरेशन पोर्टलमधील  नोंदणीकृत संस्थांची संख्या वाढवण्यासाठी सर्व स्रोतांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. घोषित साठा तपासून पाहण्यासाठी, राज्यांना सार्वजनिक आणि खाजगी अशा दोन्ही  गोदाम सेवा प्रदात्यांकडून माहिती मिळवण्याची विनंती करण्यात आली. बंदरांमधून आयात डाळींचा साठा वेळेत बाहेर आणला जाईल हे सुनिश्चित करण्यासाठी आयात मालाच्या साठवणुकीची सुविधा असलेल्या गोदामांमध्ये आयात  डाळींच्या साठ्यावर देखरेख ठेवण्याच्या गरजेवरही भर देण्यात आला.  

देशांतर्गत बाजारात तूरडाळीचे दर सामान्य राहतील आणि तूरडाळीची उपलब्धता आणि किफायतशीर दर सुनिश्चित करण्यासाठी गिरणीचालक, घाऊक व्यापारी, व्यापारी, आयातदारांकडून घोषित केल्या जाणाऱ्या साठ्यावर  लक्ष ठेवण्यासाठी सरकारने आपले प्रयत्न अधिक तीव्र केले  आहेत. 

ग्राहकांसाठी डाळींची उपलब्धता आणि परवडणारे दर सुनिश्चित करण्यासाठी मूल्य साखळीतील सर्व भागधारकांशी संवाद साधण्याचा विभागाचा विचार आहे.

डाळींशी संबंधित संघटना आणि आयातदारांनी त्यांच्याकडील साठा पारदर्शक पद्धतीने घोषित  करण्यासाठी सर्वतोपरी  सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

 

* * *

S.Patil/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1911957) Visitor Counter : 136


Read this release in: English , Urdu , Odia , Telugu