पंतप्रधान कार्यालय

वाराणसीमधील 3.85 किमी लांब सार्वजनिक वाहतुकीच्या रोपवेच्या बांधकामाची पंतप्रधानांनी केली प्रशंसा

Posted On: 29 MAR 2023 5:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 मार्च 2023

 

वाराणसी येथे 644 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या सार्वजनिक वाहतुकीसाठीच्या रोपवेच्या बांधकामाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली .

वाराणसीत 644 कोटी रुपये खर्चाचा 3.85 किमी लांबीचा रोपवे वाहतुकीसाठी उभारण्यात येत आहे अशी माहिती देणारा, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा ट्विट संदेश सामायिक करत पंतप्रधानांनी खालील ट्विट केले आहे ,

"भक्ती आणि तंत्रज्ञानाचा अद्भुत संगम ! वाराणसीत तयार होणाऱ्या या रोपवेमुळे भाविकांसाठी यात्रेचा अनुभव अधिक रोचक आणि संस्मरणीय होईल. या रोपवेमुळे बाबा विश्वनाथांचे दर्शन घेणे सोयीचे होईल."

 

* * *

S.Patil/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1911895) Visitor Counter : 120