अर्थ मंत्रालय
मर्यादाविषयक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 58 कंपन्यांच्या समभाग व्यवहारांचा सेबीकडून तपास सुरु
प्रविष्टि तिथि:
28 MAR 2023 8:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 मार्च 2023
बाजारातील फेरफार आणि अनुचित व्यापार पद्धती रोखण्यासाठी असणाऱ्या, सेबी (प्रतिभूती बाजाराशी संबंधित फसवणूक आणि अनुचित व्यापार पद्धतींवर प्रतिबंध) विनियम, 2003 चे उल्लंघन केल्याप्रकरणी, 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत, भारतीय शेयर बाजार नियामक संस्था (सेबी) 58 कंपन्यांच्या समभाग व्यवहारांचा तपास करत आहे. राज्यसभेत आज केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
या कंपन्या बनावट कंपन्या आहेत की नाही याचा शोध घेणे सेबीच्या कार्यकक्षेत येत नाही, असेही सेबीने स्पष्ट केल्याचे चौधरी यांनी सांगितले.
R.Aghor/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1911608)
आगंतुक पटल : 182