उपराष्ट्रपती कार्यालय
महिला मुष्टीयोध्यांचा राज्यसभेत सभापतींकडून आज सत्कार
Posted On:
28 MAR 2023 6:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 मार्च 2023
राज्यसभेत उपराष्ट्रपतींनी केलेले संपूर्ण निवेदन :
"माननीय सभासदहो,
हा आपल्या सर्वांसाठीच अभिमानाचा क्षण आहे नवी दिल्लीत 15 ते 26 मार्च 2023 या कालावधीत झालेल्या महिला जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत आपल्या महिला मुष्टीयोध्यांनी चार सुवर्णपदके जिंकून इतिहास घडवला आहे.
निखत झरीन
लवलीना बोर्गेहेन
नीतू घांगस
आणि स्वीटी बोरा
या सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन. त्यांचे अभूतपूर्व यश भारताचे भवितव्य शिखरावर नेत, तरुण उदयोन्मुख खेळाडूंना प्रेरणा देईल.
त्यांचे यश हे कष्ट, निश्चय हिम्मत आणि दैदीप्यमान कौशल्याचे प्रदर्शन यातून आले आहे. स्त्रीशक्तीच्या पुनर्स्थापनेचे हे युग आहे, हे या महिला मुष्टीयोध्यांनी सिद्ध केले आहे.
त्यांच्या यशामळे क्रीडा आणि खेळाडूंच्या क्षेत्रामधील आपले सातत्यपूर्ण प्रभावी अस्तित्व प्रतिबिंबित होते. या संपूर्ण सभागृहाच्या वतीने तसेच मी आपल्या सर्व देशवासीयांचा आनंद व्यक्त करत आहोत.
आपल्या यशस्वी मुष्टीयोध्यांचे अभिनंदन आणि त्यांना त्यांच्या भविष्यातील यशासाठी शुभेच्छा. त्यांचे प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचारी वर्गाचे अभिनंदन.
R.Aghor/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1911566)
Visitor Counter : 91