राष्ट्रपती कार्यालय
यूको बँकेला 80 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित कार्यक्रमाला भारताच्या राष्ट्रपतींची उपस्थिती
Posted On:
28 MAR 2023 2:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 मार्च 2023
युको बँकेला 80 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कोलकाता इथे आयोजिक कार्यक्रमात भारताच्या राष्ट्रपती, श्रीमती द्रौपदी मुर्मू आज (28 मार्च 2023) सहभागी झाल्या होत्या. यावेळी राष्ट्रपतींनी युको बँकेच्या 50 नवीन शाखांचे उदघाटन केले. UCO बँकेच्या CSR उपक्रमांतर्गत रायरंगपूर, ओडिशा इथे श्री अरबिंदो इंटिग्रल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरच्या नूतनीकरणाची पायाभरणीही राष्ट्रपतींच्या हस्ते झाली.
युको बँक 1943 मध्ये स्थापन झाल्यापासून बँकिंग क्षेत्रातील अग्रणी आणि अग्रेसर आहे, असं राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या. युको बँकेने कृषी, उद्योग, व्यापार, पायाभूत सुविधा आणि समाजकल्याण इत्यादी विविध क्षेत्रांना पतपुरवठा आणि वित्तीय सेवा प्रदान करून आपल्या देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, असे गौरवोद्गारही राष्ट्रपतींनी यावेळी काढले.
बँकांच्या दोन प्रमुख जबाबदाऱ्या आहेत. प्रथम, त्यांना सार्वजनिक पैशाचे संरक्षक व्हायला हवे. दुसरे, बँका आजच्या बचतीचा उपयोग भविष्यातील संपत्ती निर्माण करण्यासाठी करतात. या दोन जबाबदाऱ्यांचा समतोल राखणे हे प्रत्येक बँकेसाठी आव्हान आहे, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
जनतेचा पैसा मिळवण्याच्या आणि आणि त्याचे व्यवस्थापन करण्याच्या पद्धतीत फिन-टेक म्हणजेच वित्त-तंत्रज्ञान बदल घ़डवत आहे. भारतात, सर्वात गरीब आणि दुर्गम भागातही फिन-टेकचा मोठ्या प्रमाणावर वापर होणे , हा त्याचाच पुरावा आहे. भारतातले लोक त्यांना सक्षम करणारे आणि सामाजिक न्याय प्रदान करणारे तंत्रज्ञान स्वीकारायला तयार आहेत. आज, UPI हे जागतिक स्तरावर सर्वात यशस्वी फिन-टेक नवकल्पनांपैकी एक म्हणून ओळखले जाते, यावर राष्ट्रपतींनी भर दिला.
राष्ट्रपतींच्या भाषणासाठी येथे क्लिक करा.
R.Aghor/S.Mohite/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1911407)
Visitor Counter : 188