श्रम आणि रोजगार मंत्रालय

वार्षिक नियत श्रम बल सर्वेक्षण अहवाल 2021-22 नुसार कृषी क्षेत्रात महिला कामगारांची सर्वाधिक अंदाजित टक्केवारी

Posted On: 27 MAR 2023 6:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 मार्च 2023

वार्षिक नियत श्रम बल सर्वेक्षण अहवाल 2021 –22 नुसार  राष्ट्रीय औद्योगिक प्रतवारी 2008 प्रमाणे देशस्तरावर स्थूल मानाने महिला कामगारांचे औद्योगिक गटनिहाय अंदाजे टक्केवारी वितरण खाली दिलेले आहे.

Broad industry division as per NIC-2008

Male

(%)

Female

(%)

Person

(%)

agriculture

38.1

62.9

45.5

mining & quarrying

0.4

0.1

0.3

manufacturing

11.8

11.2

11.6

electricity,water,etc

0.7

0.2

0.6

construction

15.6

5.0

12.4

trade, hotel & restaurant

14.7

5.9

12.1

transport, storage & communications

7.5

1.2

5.6

Other services

11.2

13.6

11.9

       all

100.0

100.0

100.0

वरील सारणीनुसार कृषी क्षेत्रात महिलां कामगारांची  टक्केवारी सर्वाधिक आहे तर त्या खालोखाल त्या  उत्पादन क्षेत्रात आहेत.

श्रम क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग वाढावा आणि त्यांना दर्जेदार रोजगार प्राप्त व्हावा यासाठी सरकार अनेक पावले उचलत आहे.  पगारी प्रसूती रजा 12 आठवड्यांवरून 26 आठवड्यांपर्यंत वाढवणे, 50 किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या आस्थापनांमध्ये पाळणा घराची सुविधा अनिवार्य करण्याची  तरतूद, पुरेशा सुरक्षा उपायांसह रात्रपाळीत काम करण्यास महिला कामगारांना परवानगी देणे इत्यादींचा यात समावेश आहे. याशिवाय कोणताही नियोक्ता एकसमान कामासाठी किंवा कामाच्या एकसमान प्रकारासाठी कोणतेही कर्मचारी नियुक्त करताना लिंगाधारीत भेदभाव करणार नाही हे पाहिले जाते,   कायद्याने महिलांसाठी प्रतिबंधित ठराविक रोजगार याला अपवाद आहेत.  स्त्री कामगारांची रोजगार क्षमता वाढवण्यासाठी सरकार, कामगारांना महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून , राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण संस्था आणि स्थानिक व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांमधून प्रशिक्षण देते.

केंद्रीय श्रम आणि रोजगार  राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

 

 

 

N.Chitale/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 



(Release ID: 1911217) Visitor Counter : 161


Read this release in: English , Urdu , Tamil