मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
मत्स्य उत्पादनात भारत जगात तिसरा, उत्पादनात 8 टक्के वाटा तर मत्स्यपालन उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजने (पीएमएमएसवाय) अंतर्गत, देशातील एकूण मत्स्य उत्पादनाचा वाढता कल, 2019-20 मध्ये 141.64 लाख टनावरून 2021-22 मध्ये 162.48 लाख टन मत्स्य उत्पादनाची नोंद
Posted On:
24 MAR 2023 8:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 मार्च 2023
भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा मत्स्यउत्पादक देश आहे. जागतिक मत्स्योत्पादनात भारताचे 8 टक्के योगदान आहे. मत्स्यपालन उत्पादनात तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2021-22 मधील मत्स्य उत्पादन 16.24 दशलक्ष टन होते. त्यात 4.12 दशलक्ष टन समुद्री माशांचे उत्पादन आणि 12.12 दशलक्ष टन मत्स्यपालनातील उत्पादन होते. काही प्रमाणात समोर येणाऱ्या आव्हानांमध्ये पैदास दर्जा राखणे, शीतगृहांची साखळी, पायाभूत सुविधांच्या गरजा पूर्ण करणे आणि पायाभूत सुविधांचा समावेश होतो.
2020-21 मध्ये प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा आरंभ झाल्यापासून, देशातील एकूण मत्स्य उत्पादनात वाढ होत आहे. 2019-20
मध्ये 141.64 लाख टना वरून 2021-22 मध्ये 162.48 लाख टन मत्स्य उत्पादनाची नोंद झाली आहे.
केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री परशोत्तम रुपाला यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
G.Chippalkatti/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1910491)
Visitor Counter : 783