संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण सामग्रीचे उत्पादन

Posted On: 24 MAR 2023 4:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 मार्च 2023

सरकारने संरक्षण क्षेत्रात परदेशी मूळ सामग्री उत्पादकांसोबत काम करणाऱ्या 45 कंपन्या/संयुक्त उपक्रम यांना मान्यता दिली आहे. त्याशिवाय गेल्या काही वर्षात सरकारने देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादन क्षेत्रात अनेक धोरणात्मक उपक्रम सुरू केले आहेत आणि स्वदेशी बनावटीच्या रचना, विकास आणि उत्पादन यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुधारणा केल्या आहेत. ज्यामुळे आगामी काळात आयातीवरील अवलंबित्व कमी होणार आहे. या उपक्रमांमध्ये संरक्षण खरेदी प्रक्रिया(डीएपी)-2020 अंतर्गत देशांतर्गत स्रोतांकडून भांडवली साहित्य खरेदीला प्राधान्य देणे, संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादक विभागाकडून  तीन सकारात्मक स्वदेशीकरण याद्यांची एका कालमर्यादेसह अधिसूचना ज्यानंतर त्यांना केवळ देशांतर्गत उद्योगांकडूनच खरेदी करता येईल. या तीन याद्यांमध्ये 3738 जिन्नस आहेत, ज्यापैकी 2786 जिन्नसांचे फेब्रुवारी 2023 पर्यंत स्वदेशीकरण करण्यात आले आहे. औद्योगिक परवाना प्रक्रियेला जास्त मुदतीचा वैधता कालावधी देऊन तिचे सुलभीकरण, ऑटोमॅटिक रुट अंतर्गत 74% एफडीआयला परवानगी देऊन थेट परकीय गुंतवणुकीच्या धोरणाचे उदारीकरण, प्रक्रियेचे सुलभीकरण, स्टार्ट अप्स आणि एमएसएमईंचा सहभाग असलेल्याआयडेक्स अर्थात इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्सलन्स योजनेचा प्रारंभ, सार्वजनिक खरेदीची(मेक इन इंडियाला प्राधान्य) अंमलबजावणी, एमएसएमईसह भारतीय उद्योगांना स्वदेशीकरणाची सुविधा मिळावी या उद्देशाने स्रीजन या स्वदेशीकरण पोर्टलचा प्रारंभ, संरक्षण उत्पादनासाठी गुंतवणूक आकर्षित करण्याला आणि तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणासाठी ऑफसेट धोरणात सुधारणा, उत्तर प्रदेश आणि तमिळनाडूत प्रत्येकी एक अशा दोन संरक्षण उद्योग मार्गिकांची उभारणी यांसारखे उपक्रम सुरू आहेत.

संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी आज लोकसभेत मलुक नगर यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

 

 

 

G.Chippalkatti/S.Patil/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1910347) Visitor Counter : 156
Read this release in: English , Urdu , Punjabi