राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

जागतिक क्षयरोग दिनानिमित राष्ट्रपतींचा राष्ट्राला संदेश

प्रविष्टि तिथि: 23 MAR 2023 8:59PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23  मार्च 2023

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 24 मार्च या जागतिक क्षयरोग दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून संदेश दिला आहे. आपल्या संदेशात त्या म्हणतात :-

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त उद्या, म्हणजेच 24 मार्च 2023 रोजी ‘जागतिक क्षयरोग शिखर परिषदेचे’ आयोजन केल्याबद्दल मी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि स्टॉप टीबी या संस्थेचे अभिनंदन करते.

क्षयरोग दिन ही क्षयरोगामुळे आरोग्यावर होणारे प्रतिकूल परिणाम तसेच गंभीर सामाजिक आणि आर्थिक परिणामांबद्दल जनजागृती करण्याची तसेच क्षयरोगाच्या जागतिक महामारीचे उच्चाटन  करण्यासाठीच्या प्रयत्नांना गती देण्याची एक प्रभावी संधी आहे. क्षयरोगाचा जगभरातील लाखो लोकांवर विपरीत परिणाम होते. क्षयरोगाचा मुकाबला करण्यासाठी आपल्या देशाचे सामूहिक प्रयत्न सुरु असून, आपली राष्ट्रीय मोहिम समतोल साधणाऱ्या, सर्वांना परवडणाऱ्या आणि सुलभ आरोग्य सेवा प्रणाली अशा सगळ्या प्रयत्नातून, प्रतिबिंबित होत आहे. या मोहिमेचा समाजातील सर्व घटकांना लाभ मिळणार आहे.

क्षयरोग निर्मूलनाच्या क्षेत्रात कार्यरत सर्व हितसंबंधियांनी एकत्रित येऊन भारताला टीबीमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत. चला, आपण सगळे या उद्दिष्टपूर्तीसाठी पुन्हा एकदा स्वतःला समर्पित करण्याचा संकल्प करुया.

राष्ट्रपतींचा संपूर्ण संदेश वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

G.Chippalkatti/R.Aghor/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 


(रिलीज़ आईडी: 1910186) आगंतुक पटल : 308
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , Odia