रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झारखंड मधील जमशेदपूर, येथे 3843 कोटी रुपयांच्या 10 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी
Posted On:
23 MAR 2023 6:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 मार्च 2023
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज झारखंडमधील जमशेदपूर येथील बिष्टुपूर येथे 3843 कोटी रुपये खर्चाच्या 220 किमी लांबीच्या 10 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली.

झारखंडमधील रांची-जमशेदपूर मार्गावरील काली मंदिर ते बालिगुमा हा पहिला चौपदरी डबल डेकर उन्नत मार्ग 1876 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला असून त्यामुळे 45 मिनिटांचा प्रवास 5 मिनिटांत पूर्ण होईल.

रांची ते जमशेदपूर आंतर कॉरिडॉरमुळे पश्चिम बंगाल ते ओडिशा यांच्यातील दळणवळण सुधारेल, असे गडकरी यांनी सांगितले. हा कॉरिडॉर रांची शहराला बायपास करेल आणि दिल्ली-कोलकाता महामार्ग (NH-2) आणि पूर्व-पश्चिम कॉरिडॉर (NH-6) ला जोडेल, त्यामुळे जमशेदपूर ते कोलकाता असा थेट संपर्क प्रस्थापित होईल, असे ते म्हणाले. कोलाविरा रस्त्याच्या निर्मितीमुळे, पश्चिम सिंगभूम जिल्ह्यातील हतगमरिया ते बोकना हाथीचौक (NH-320G) हा मार्ग नक्षलग्रस्त भाग आणि महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांना अधिक चांगली संपर्क सुविधा प्रदान करेल, असे ते म्हणाले.

G.Chippalkatti/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1910109)
Visitor Counter : 147