गृह मंत्रालय

नवी दिल्ली इथे राष्ट्रपती भवनामध्ये आयोजित दिमाखदार सोहळ्यात, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 2023 सालासाठी तीन पद्मविभूषण, चार पद्मभूषण आणि सत्तेचाळीस पद्मश्री पुरस्कार केले प्रदान

Posted On: 22 MAR 2023 8:47PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 मार्च 2023

 

नवी दिल्ली इथे राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये आज (22 मार्च 2022,) आयोजित करण्यात आलेल्या दिमाखदार सोहळ्यात, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यांनी 2023 सालासाठी तीन पद्मविभूषण, चार पद्मभूषण आणि सत्तेचाळीस पद्मश्री पुरस्कार प्रदान केले.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह, यांच्यासह इतर केंद्रीय मंत्री आणि मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते.

पुरस्कार समारंभानंतर, केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा आणि इतर केंद्रीय मंत्र्यांनी नवी दिल्ली इथल्या सुषमा स्वराज भवन मध्ये केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री यांनी आयोजित केलेल्या भोजन समारंभात पद्म पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधला.

पद्म पुरस्कार विजेते उद्या सकाळी (23 मार्च 2023) राष्ट्रीय युद्ध स्मारक इथे हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करतील. अमृत उद्यान आणि राष्ट्रपती भवन, तसेच पंतप्रधान संग्रहालयालाही ते भेट देतील.

 

* * *

Jaydevi PS/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1909722) Visitor Counter : 168