अर्थ मंत्रालय

31 जुलै 2022 रोजी एका दिवसात 72,42,156 इतक्या सर्वाधिक संख्येने प्राप्तिकर विवरणपत्रे दाखल झाली


प्राप्तिकर विवरणपत्रे सादर केल्यापासून 24 तासांच्या आत एकूण विवरणपत्रांपैकी 42.92% विवरणपत्रांची छाननी केली गेली.

ऑनलाइन कर भरणा प्रणाली TIN 2.0 वर 19 बँका सहभागी झाल्या

Posted On: 20 MAR 2023 9:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 मार्च 2023

केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांत कररचनेचे सातत्य आणि स्थैर्य राखण्यासाठी, अनुपालन ओझे कमी करण्यासाठी विविध तरतुदी अधिक सुलभ आणि तर्कसंगत करण्याच्या दिशेने तसेच उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नागरिकांना कर सवलत देण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

या उपाययोजनांचा तपशील:

याबाबत अधिक तपशील देताना, ते  म्हणाले की, आयकर ई-फायलिंग पोर्टलद्वारे 2022-23 वर्षासाठी दाखल करण्यात आलेल्या प्राप्तिकर विवरणपत्रे  कमाल, किमान आणि सरासरी  24 तासांच्या कालावधीत तपासण्यात आली , त्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

  • एका दिवसात दाखल विवरणपत्रांची सर्वात कमी संख्या: 1 (10 एप्रिल 2022 रोजी – ज्या दिवशी ITR 1 आणि 4 सुरु केले गेले )
  • एका दिवसात दाखल  विवरणपत्रांची   सर्वाधिक संख्या: 72,42,156 ( 31 जुलै 2022 रोजी, म्हणजेच 139(1) अंतर्गत रिटर्न भरण्याची अंतिम तारीख)
  • एका दिवसात दाखल  विवरणपत्रांची सरासरी संख्या: 2,82,559 (10 एप्रिल 2022 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत दाखल केलेली एकूण  विवरणपत्रे : 7,51,60,817. एकूण दिवस : 266. 7,51,60,817/266 = 2,82,559)

याव्यतिरिक्त , 2022-23 वर्षात , 3,02,40,121 आयटीआर (म्हणजे एकूण विवरणपत्रांच्या  42.92%) सादर केल्याच्या 24 तासांच्या कालावधीत प्रक्रिया करण्यात आली  असे ते म्हणाले.

याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की करदाता पोर्टल (ई-फायलिंग पोर्टल) सुधारण्याचा सातत्याने सतत प्रयत्न केला जात  आहे. या संदर्भात केलेल्या  काही उपाययोजनांमध्ये ऑनलाइन कर भरणा प्रणाली (TIN 2.0) चा प्रारंभ  समाविष्ट आहे ज्यामध्ये  आतापर्यंत 19 बँका सहभागी झाल्या आहेत. या पोर्टलने करदात्यांना कर भरण्यासाठी नवीन पेमेंट पद्धती उपलब्ध करून दिल्या. यामुळे भरलेला कर लवकर जमा झाला. तसेच ,करदात्यांना सुलभ कर अनुपालनासाठी संबंधित विषयांवर जागरूकता निर्माण करण्यासाठी पोर्टलवर शैक्षणिक व्हिडिओ आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न  सतत अपलोड केले जात आहेत. अलीकडे, पोर्टलशी संबंधित समस्यांच्या संदर्भात हेल्पडेस्क टीमद्वारे करदात्यांना मदत देण्यासाठी पोर्टलवर को -ब्राउझिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

ते पुढे म्हणाले की सामायिक प्राप्तिकर विवरणपत्र (CTR) ट्रस्ट वगळता इतर सर्व व्यक्तींसाठी सामायिक प्राप्तिकर विवरणपत्र म्हणून प्रस्तावित केले आहे.  विवरणपत्र भरण्यात सुलभता आणणे आणि व्यक्ती आणि बिगर -व्यावसायिक-श्रेणीतील करदात्यांना विवरणपत्र भरण्यासाठी लागणारा वेळ कमी करणे हे प्रस्तावित विवरणपत्रचे उद्दिष्टआहे. करदात्यांना त्यांना लागू नसलेल्या बाबी  पाहण्याची आवश्यकता नाही. उत्तम व्यवस्था, तार्किक प्रवाह आणि प्री-फिलिंगच्या वाढीव व्याप्तीसह करदात्यासाठी सुलभपणे या अर्जाची रचना केली आहे. आयटीआरमध्ये नोंदल्या जाणार्‍या डेटाच्या संदर्भात आयकर विभागाकडे उपलब्ध असलेल्या तृतीय-पक्ष डेटाची योग्य पडताळणी करून करदात्यांवरील अनुपालनाचे ओझे कमी  करेल. सामायिक प्राप्तिकर विवरणपत्रचा मसुदा सर्व भागधारकांच्या सूचना  आमंत्रित करून सार्वजनिक डोमेनमध्ये अपलोड करण्यात आला.

आयकर विभागाकडे खालील तक्रार निवारण यंत्रणा आहेतः

  • ई-फायलिंग पोर्टलवर ई-निवारण मॉड्यूल
  • प्रत्येक Pr.CCIT मध्ये उच्च स्तरीय मूल्यांकन समित्या.
  • प्रत्येक Pr.CCIT मध्ये करदाता चार्टर सेल
  • DARPG पोर्टलवर CPGRAM

ते  पुढे म्हणाले की तक्रार निवारण यंत्रणा मजबूत करणे ही एक निरंतर  प्रक्रिया आहे. वाढीव देखरेख आणि करदात्याने दाखल केलेल्या विविध तक्रारींवरील  प्रतिसाद वेळ कमी करून  विविध तक्रार निवारण यंत्रणांना चालना देण्यात आली आहे. अधिनियमांतर्गत कार्यपद्धतींचे वाढते  डिजिटलायझेशन देखील करदात्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात सुधारणा करण्यास हातभार लावत आहे, असे ते म्हणाले.

 

 

 

 

G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1908968) Visitor Counter : 156


Read this release in: Urdu , Hindi , English