कोळसा मंत्रालय
देशातील कोळशाचे उत्पादन आणि वार्षिक वापर
Posted On:
20 MAR 2023 7:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 मार्च 2023
चालू आर्थिक वर्ष 2022-2023 मध्ये (फेब्रुवारी, 2023 पर्यंत), देशात सुमारे 785.24 मेट्रिक टन कोळशाचे उत्पादन झाले आहे, जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीत झालेल्या सुमारे 681.98 मेट्रिक टन उत्पादनापेक्षा सुमारे 15.14% जास्त आहे. सन 2021-2022 मध्ये देशभरातील कोळसा उत्पादन 778.19 दशलक्ष टन (एमटी) होते जे 2020-2021 मधील 716.08 एमटी च्या तुलनेत सुमारे 8.67% जास्त होते. देशातील कोळशाची बहुतांश गरज स्वदेशी उत्पादन/पुरवठ्यातून भागवली जाते. कोळशाचे देशांतर्गत उत्पादन वाढवण्यावर आणि देशातील कोळशाची अनावश्यक आयात दूर करण्यावर सरकारचे लक्ष आहे.
गेल्या पाच वर्षातील देशातील कोळसा पुरवठा, आयात आणि वापराचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
[आकडे दशलक्ष टनमध्ये (एमटी)]
[Figures in Million Tonnes (MT)]
|
Year
|
2017-18
|
2018-19
|
2019-20
|
2020-21
|
2021-22
|
Total Consumption / Demand (a+b)
|
898.25
|
968.14
|
955.72
|
906.13
|
1027.92
|
Total Import (b)
|
208.25
|
235.35
|
248.54
|
215.25
|
208.93
|
Total Domestic coal Supply (a)
|
690.00
|
732.79
|
707.18
|
690.88
|
818.99
|
वर्ष 2022-23 साठी, डिसेंबर 2022 पर्यंत एकूण आयात 186.06 एमटी आहे आणि फेब्रुवारी 2023 पर्यंत एकूण देशांतर्गत कोळसा पुरवठा 794.96 एमटी आहे.
इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, अमेरिका आणि रशिया हे 5 प्रमुख परदेशी कोळसा पुरवठादार देश आहेत.
कोळसा, खाण आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
G.Chippalkatti/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1908910)
Visitor Counter : 158