संरक्षण मंत्रालय
संरक्षण उत्पादनांची निर्यात
Posted On:
20 MAR 2023 6:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 मार्च 2023
डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स प्रोडक्शन अर्थात संरक्षणसामग्री उत्पादक विभागाने (DDP) स्पेशल केमिकल्स, ऑर्गेनिझम, मटेरिअल्स, इक्विपमेंट अँड टेक्नॉलॉजी (SCOMET) च्या श्रेणी 6 मध्ये समाविष्ट असलेल्या युद्धसामग्री सूचीच्या वस्तूंच्या निर्यातीसाठी कायदेशीर परवानगी दिली आहे. डीडीपीने जारी केलेल्या मानक कार्यप्रणालीनुसार (एसओपी) अशा निर्यातीला परवानगी दिली जाते. ही उपकरण सामग्री जगभरातील विविध देशांमध्ये निर्यात केली जाते. याबाबतीत ज्या देशांसोबत करार झाले आहेत आणि वाटाघाटी झाल्या आहेत त्यांची नावे धोरणात्मक कारणांमुळे उघड करता येत नाहीत. गेल्या पाच वर्षांतील संरक्षण सामग्रीच्या निर्यातीचे मूल्य खालीलप्रमाणे आहे.
(Rs in Crores)
|
2017-18
|
2018-19
|
2019-20
|
2020-21
|
2021-22
|
2022-23
(till 14.03.2023)
|
Value of Export
|
4,682
|
10,746
|
9,116
|
8,435
|
12,815
|
13,399
|
संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी आज राज्यसभेत विजय पाल सिंह तोमर यांच्या प्रश्नावर लेखी उत्तर देताना ही माहिती दिली.
G.Chippalkatti/V.Yadav/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1908872)
Visitor Counter : 137