संरक्षण मंत्रालय

संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भरता

Posted On: 20 MAR 2023 5:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 मार्च 2023

आत्मनिर्भरतेला चालना देण्यासाठी, संरक्षण मंत्रालयाने चार सकारात्मक स्वदेशीकरण याद्या अधिसूचित केल्या आहेत ज्यात 411 प्रमुख शस्त्र प्लॅटफॉर्म/प्रणाली यांचा समावेश आहे ज्यात त्यांच्या निर्धारित कालमर्यादेनुसार आयात करण्यावर बंदी आहे. तसेच, संरक्षण मंत्रालयाने संरक्षण सार्वजनिक क्षेत्र उपक्रमाच्या संदर्भात तीन सकारात्मक स्वदेशीकरण याद्या देखील अधिसूचित केल्या आहेत, ज्यात 3,738 प्रमुख लाईन रिप्लेसमेंट युनिट्स/सब-सिस्टम/असेम्ब्ली/सब -असेम्ब्ली/घटक आणि सुटे भाग यांचा समावेश आहे ज्यात निर्धारित कालमर्यादेनुसार  त्यांच्या आयातीवर बंदी आहे. तसेच, श्रीजन पोर्टलवर 26,000 हून अधिक संरक्षण वस्तू अपलोड केल्या गेल्या आहेत आणि स्वदेशीकरणासाठी उद्योगांना देऊ केल्या आहेत. स्वदेशीकरण ही एक गतिमान प्रक्रिया आहे. आत्तापर्यंत, 7,031 वस्तू आधीच स्वदेशी बनवल्या गेल्या आहेत, ज्या देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेची पूर्तता करतात. डिसेंबर 2022 पर्यंतच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, 2018-19 पासून संरक्षण आयात 46% वरून 36.7% पर्यंत कमी झाली आहे.

संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी आज राज्यसभेत राकेश सिन्हा यांना दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

 

 

 

G.Chippalkatti/V.Joshi/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1908868) Visitor Counter : 148


Read this release in: English , Urdu , Tamil