विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

बुरशीमुळे निर्माण झालेल्या लॅकेज उत्प्रेरकामध्ये औद्योगिक डायचा घातक थर वाहून नेण्याची क्षमता दिसून येते

Posted On: 19 MAR 2023 6:10AM by PIB Mumbai

 

बुरशी समूहाने निर्माण केलेल्या लॅकेज या उत्प्रेरकामध्ये वस्त्रोद्योग क्षेत्रात कपडे डाय केल्यानंतर नियमित स्वरुपात जलाशयात वाहून जाणारे विविध प्रकारचे घातक सेंद्रिय डाय रेणू नष्ट करण्याची क्षमता असल्याचे आढळून आले आहे. अधिक हरित पर्यावरणासाठी नैसर्गिक उपाय म्हणून शास्त्रज्ञांनी सब्सट्रेट प्रॉमिस्क्युटी या नावाने संबोधित केलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण कृतीच्या  माध्यमातून डायमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होत असलेल्या पाण्यावर प्रक्रिया होण्यासाठी उत्प्रेरक आवरणाची रचना होत दूरगामी परिणाम घडू शकतो.

लॅकेजमध्ये विविध सेंद्रिय रेणू कमी करण्याची क्षमता पूर्वीपासून परिचित होती. परिणामी, वस्त्रोद्योगांतून बाहेर पडणाऱ्या घातक डायवर प्रक्रिया करण्यासाठी/प्रभाव कमी करण्याच्या उद्देशाने तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी शास्त्रज्ञांना त्याचा वापर करण्याची संधी दिसून आली.

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (DST) याची स्वायत्त संस्था असलेल्या कोलकाताच्या एस.एन. बोस मुलभूत विज्ञान राष्ट्रीय केंद्राचे (SNBNCBS) प्रा रणजित बिस्वास आणि डॉ सुमन चक्रबर्ती यांच्या संयुक्त पथकाने मिथाइल ग्रीन, क्रिस्टल व्हायोलेट, थिओफ्लेविन टी, क्युमारीन 343 आणि ब्रिलियंट ब्ल्यू यासारख्या काही प्रमाणित डाय रेणूंचा प्रभाव कमी करण्यासाठी लॅकेजच्या  परिणामकारकतेची चाचणी केली.

अतिनील/दृश्यमान स्पेक्ट्रोस्कोपी आणि संगणकीय प्रतिमा एकत्र करून त्यांनी हे स्पष्ट केलं की लॅकेज उत्प्रेरकामुळे भार, आकारमान आणि आकारात  निरनिराळी गतीमानता असलेले अनेक सेंद्रिय डाय रेणूचा प्रभाव कमी करता येऊ शकतो. बुरशी समूहामुळे निर्माण झालेल्या लॅकेजमध्ये कॉपरचे चार अणू दोन निरनिराळ्या ऑक्सिडेशन स्थितीत असतात आणि रेडॉक्स रासायनिक बदलांमुळे घातक थरांचा प्रभाव कमी करत फक्त पाणी आणि कार्बन, नायट्रोजन आणि सल्फरचे सर्वात सामान्य किंवा कमी विषाणूजन्य ऑक्साईड तयार करतात.

संगणकीय प्रतिमा आणि आरेखनांचा वापर करून शास्त्रज्ञांनी या सब्सट्रेट प्रॉमिस्क्युटीमागील रेण्वीय उर्जागतिकाचे मूळ आणि यंत्रणा स्पष्ट केली आहे. आण्विक डॉकिंग आणि रेण्वीय उर्जागतिकाच्या (MD) सखोल अभ्यासाने निदर्शनास आले आहे की सक्रिय जागा झाकणाऱ्या आवरणाच्या रचनात्मक लवचिकतेमुळे लॅकेजची सक्रिय जागा विविध आकारमान आणि आकारांसह डाय रेणूंची व्यापक श्रेणी सामावून घेऊ शकते. ठराविक बंधांचा आकार अनुकूलपणे बदलू शकतो. विविध प्रकारच्या परस्पर क्रियान्वयनांच्या माध्यमातून भिन्न रेणूंचे अंतर्गत बंध रद्द होत विभिन्न रेणू एकसमान बंधात एकत्र येतात. औद्योगिक डायचा घातक प्रभाव कमी करण्यासाठी लॅकेजची ही सब्सट्रेट प्रॉमिस्क्युटी प्रचंड मोठ्या एककात अनोखी जैव-तंत्रज्ञान क्षमता प्रदान करते.

प्रकाशन लिंक: doi: 10.1021/acs.jpclett.2c03126

अधिक तपशिलांसाठी, कृपया प्रा. रणजीत बिस्वास (ranjit[at]bose[dot]res[dot]in) आणि डॉ. सुमन चक्रबर्ती  (sumanc[at]bose[dot]res[dot]in). यांच्याशी संपर्क साधावा.

***

M.Jaybhaye/S.Naik/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1908498) Visitor Counter : 251


Read this release in: English , Hindi , Tamil