सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

वाराणसीत खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या वतीने खादी प्रदर्शनाचे आयोजन, 2215 लाभार्थ्यांना रु. 77.45 कोटींचे तारण अनुदान वितरीत 

Posted On: 18 MAR 2023 9:33PM by PIB Mumbai

 

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे आयोजित राज्यस्तरीय खादी प्रदर्शनाचे उद्घाटन खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष  मनोज कुमार यांनी आज  केले.हे प्रदर्शन 17 मार्च 2023 ते 26 मार्च 2023 पर्यंत 10 दिवसांच्या कालावधी सुरु राहणार आहे.खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या वतीने राबवण्यात येणारी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची रोजगाराभिमुख पथदर्शी  योजना, पंतप्रधानांच्या रोजगार निर्मिती कार्यक्रम (पीएमईजीपी ) अंतर्गत  मध्य  आणि पूर्व विभागातील 2215 लाभार्थ्यांना मंजूर केलेल्या रु. 227.21 कोटी कर्जापोटी रु. 77.45 कोटींचे तारण अनुदान  देखील अध्यक्षांनी वितरीत केले.

मनोज कुमार यांनी खादी ग्रामोद्योग विकास समिती, मारुई, सिंधौरा, वाराणसी येथे कुंभारकाम करणाऱ्या कारागिरांना 180 इलेक्ट्रिक कुंभारकाम चाके आणि चामड्याच्या वस्तू बनवणाऱ्या कारागिरांना 75 पादत्राणे दुरुस्ती साधने तसेच  अकबरपूर, आंबेडकर नगर येथील 30 मधुमक्षिका पालकांना 300 मधमाश्यांच्या पेट्या वितरित केल्या.

एक समृद्ध, बळकट, आत्मनिर्भर आणि आनंदी राष्ट्र निर्माण करण्यासाठी   लाभार्थ्यांना त्यांचे उद्योग  यशस्वीपणे चालवण्यासाठी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या अध्यक्षांनी  प्रेरित केले.

***

G.Chippalkatti/S.Chavan/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1908462) Visitor Counter : 118


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu