अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सीमाशुल्क, उत्पादन शुल्क आणि सेवा कर अपिलीय प्राधिकरण उद्या साजरी करणार वैभवशाली आणि यशस्वी प्रवासाची 40 वर्षे

Posted On: 17 MAR 2023 4:13PM by PIB Mumbai

 

सीमाशुल्क, उत्पादन शुल्क आणि सेवा कर अपिलीय प्राधिकरण (CESTAT) उद्या आपल्या 40 वर्षांच्या वैभवशाली आणि यशस्वी वाटचाल साजरी करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती दिनेश महेश्वरी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आणि दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सतीशचंद्र शर्मा सन्माननीय अतिथी म्हणून उद्घाटन समारंभाला उपस्थित असतील. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती यशवंत वर्मा, अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाचे सचिव विवेक जोहरी, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ आणि कस्टम्स(सीबीआयसी) चे अध्यक्ष देखील उद्घाटन सोहळ्यात सहभागी होतील. सीईएसटीएटीच्या वैभवशाली 40 वर्षांच्या वाटचालीची माहिती देणाऱ्या एका स्मरणिकेचे प्रकाशन देखील या कार्यक्रमात होणार आहे. सीईएसटीएटीचे अध्यक्ष न्यायमूर्ती दिलिप गुप्ता दिल्लीच्या मुख्य पीठाचे सदस्य तसेच सीईएसटीएटीच्या इतर 7 प्रादेशिक पीठांच्या सदस्यांसह आणि प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह या कार्यक्रमाचे नेतृत्व करतील. प्राधिकरणाचे सदस्य, देशभरातील बार सदस्य आणि विभागाचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

 

सीईएसटीएटी विषयी:

भारतीय राज्यघटनेचे कलम 323 ब आणि सीमाशुल्क कायदा, 1962च्या 129व्या कलमांतर्गत 11 ऑक्टोबर 1982 रोजी सीईएसटीएटी अर्थात सीमाशुल्क, उत्पादन शुल्क आणि सेवा कर अपिलीय प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली होती. कस्टम्स कायदा, 1962 सह काही विशिष्ट कायद्यांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी प्राधिकरण सुधारणा कायदा 2021 आता लागू करण्यात आला आहे आणि या कायद्यातील कलम 3 ने  प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करण्यासाठी प्राधिकरण( सेवेच्या अटी) नियम, 2021 तयार करण्यात आले आहेत.

***

N.Chitale/S.Patil/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1907996) Visitor Counter : 170


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu