ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
इलेक्ट्रॉनिक निगोशिएबल वेअरहाऊस पावती तारण ठेवून वित्तपुरवठा सुलभ करण्यासाठी गोदामे विकास नियमक प्राधिकरण आणि पंजाब नॅशनल बँक यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी
Posted On:
16 MAR 2023 10:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 मार्च 2023
शेतकरी आणि व्यापाऱ्यांना कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी, गोदामे विकास नियामक प्राधिकरणाने (WDRA) पंजाब नॅशनल बँके बरोबर (PNB) डब्ल्युडीआरए चे अध्यक्ष टी.के.मनोज कुमार, सदस्य मुकेश कुमार जैन, पंजाब नॅशनल बँकेचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल कुमार गोयल, मुख्य महाव्यवस्थापक सुनील कुमार चुग आणि इतर वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

इलेक्ट्रॉनिक निगोशिएबल वेअरहाऊस रिसीप्ट तारण ठेवून वित्तपुरवठा उपलब्ध करून देण्यार्या वैशिष्ट्यांची जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली असून हा वित्त पुरवठा कोणत्याही अतिरिक्त कारणाशिवाय आणि आकर्षक व्याजदरांसह उपलब्ध आहे. या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट ठेवीदारांना लाभांची माहिती देणे, तसेच भारतातील कृषी तारण वित्त सुधारण्याच्या दिशेने पाऊल उचलणे हे आहे.
लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक निगोशिएबल वेअरहाऊस पावती योजनेच्या अंमलबजावणीमुळे दूरगामी परिणाम होतील असा अंदाज केला जात आहे. गोदामात माल साठवण्याच्या सुविधेमुळे ग्रामीण ठेवीदारांन काढणी पश्चात घाईने उत्पादन विकण्याची गरज पडणार नाही आणि उत्पादनासाठी चांगल्या किंमतीची प्रतीक्षा करण्याची क्षमता आहे.
इलेक्ट्रॉनिक निगोशिएबल वेअरहाऊस पावती प्रणालीची अंतर्निहित सुरक्षितता आणि वाटाघाटी यामुळे हे उत्पादन ग्रामीण तरलता सुधारण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी खूप लाभदायक ठरेल.
या कार्यक्रमादरम्यान, ग्रामीणभागातील पत पुरवठा सुधारण्यासाठी गोदामात ठेवलेल्या कापणीपश्चात उत्पादनाच्या पावत्या तारण ठेवून त्यावर वित्तपुरवठा करण्याच्या महत्त्वावर डब्ल्युडीआरए ने सादरीकरण केले. देशभरातील बँक अधिकारी दूरदृष्टी प्रणाली द्वारे या कार्यक्रमात सामील झाले होते. बँक प्रतिनिधींनी या क्षेत्रातील कर्ज देणाऱ्या संस्थांना भेडसावणाऱ्या जोखमीबाबत माहिती दिली.
* * *
JPS/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1907822)
Visitor Counter : 166