संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

“लष्करी मंचांवर ह्युमन फॅक्टर्स इंजिनियरिंग” या विषयावर डीआरडीओने आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेची नवी दिल्लीत सांगता

Posted On: 16 MAR 2023 9:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 मार्च 2023

 

संरक्षण, संशोधन आणि विकास संघटना- डीआरडीओने नवी दिल्लीत आयोजित केलेल्या, “ह्युमन फॅक्टर्स इंजिनियरिंग इन मिलिटरी प्लॅटफॉर्म” म्हणजे, लष्करी मंचांवर मानवी वापरासाठी उपकरणे आणि प्रणालींच्या डिझाइनमध्ये (सैनिकांच्या) शारीरिक आणि मानसिक वैशिष्ट्यांच्या माहितीच्या वापराशी संबंधित विज्ञान, या विषयावरील दोन दिवसीय कार्यशाळेची आज, 16 मार्च 2023 ला सांगता झाली. या कार्यशाळेचे आयोजन, शरीरशास्त्र आणि संबंधित विज्ञानविषयक संरक्षण संस्था(डीआयपीएएस), या डीआरडीओच्या प्रयोगशाळेने केले होते. स्वदेशी उत्पादनांच्या प्रॉडक्ट लाईफ सायकलमध्ये, ह्युमन फॅक्टर्स इंजिनियरिंगची(एचएफई) अंमलबजावणी करण्यासाठी, भविष्याचा एक आराखडा तयार करण्याच्या हेतूने ही परिषद आयोजित करण्यात आली होती.

सशस्त्र दल, सीएपीएफ, उद्योग आणि डीआरडीओ मधील भागधारकांच्या दोन दिवसांच्या विचारमंथनानंतर, संरक्षण मंत्री डॉ जी सतीश रेड्डी यांचे वैज्ञानिक सल्लागार यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा झाली. संरक्षण विभागाच्या संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष  डॉ समीर व्ही कामत,  आर्मर्ड कॉर्प्सचे महासंचालक, लेफ्टनंट जनरल करणबीर सिंग ब्रार; आयटीबीपीचे महासंचालक अनिश दयाल; इन्फंट्रीचे अतिरिक्त महासंचालक, आर्मी डिझाइन ब्युरोचे अतिरिक्त महासंचालक, युद्धनौका डिझाइन ब्युरोचे महासंचालक, DRDO चे महासंचालक आणि टीएएसलचे  वरिष्ठ अधिकारी, लार्सन अँड टुब्रो, माझगाव डॉक, हिंदुस्थान शिपयार्ड चे अधिकारी या परिषदेला उपस्थित होते.

सर्व स्वदेशी उत्पादनांसाठीच्या डिझाइनविषयक  दस्तऐवजात ह्युमन फॅक्टर्स इंजिनियरिंग म्हणजे मानवी घटक अभियांत्रिकी (HFE) चा समावेश करणे आणि वापरकर्त्यांच्या सहभागाने त्याविषयी धोरण तयार करणे अशा शिफारशी या परिषदेत करण्यात आल्या. भारतीय सैनिकांच्या एन्थ्रोपोमेट्री म्हणजे शारीरिक मोजमापविषयक डेटाबेसची निर्मिती आणि त्याविषयीची भारतीय मानके तयार करण्यावर सर्व सहभागी सदस्यांनी भर दिला.

संरक्षण मंत्र्यांच्या वैज्ञानिक सल्लागारांनी प्राथमिक सेवांमध्ये गुणात्मक आवश्यकता (PSQRs) मध्ये आवश्यक ते मापदंड म्हणून मानवी घटक अभियांत्रिकी (एचएफई) समाविष्ट करण्याची सूचना केली. भागधारकांशी संवाद साधून आणि आवश्यक धोरणे आणि मानके तयार करून एचएफईची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी डीआयपीएस वर सोपवण्यात आली आहे.

स्वदेशी उत्पादनांच्या डिझाईन आणि विकासामध्ये एचएफईचा समावेश करणे ही संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एक झेप ठरेल, असे डीआरडीओच्या अध्यक्षांनी सांगितले.

 

* * *

S.Patil/R.Aghor/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1907765) Visitor Counter : 137


Read this release in: English , Urdu , Hindi