मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
'मूलभूत पशुसंवर्धन सांख्यिकी 2022' चे प्रकाशन
Posted On:
15 MAR 2023 8:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 मार्च 2023
केंद्रीय मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन मंत्री परषोत्तम रुपाला यांनी आज (15 मार्च 2023) विभागाच्या 'मूलभूत पशुसंवर्धन सांख्यिकी या वार्षिक पुस्तिकेच्या 2022 च्या आवृत्तीचे अनावरण केले. यावेळी पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकाऱी उपस्थित होते. प्रकाशन केल्याबद्दल रूपाला यांनी पशुसंवर्धन सांख्यिकी विभागाचे अभिनंदन केले. हे पुस्तक म्हणजे पशुधन क्षेत्रातील परंपरा आणि माहितीचा महत्त्वाचा स्रोत बनल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
पशुधन लोकसंख्या, पशुधन उत्पादन आणि पशु रोग, पायाभूत सुविधा अशा महत्त्वाच्या पशुधन आकडेवारी या पुस्तकात असून हे पुस्तक पशुसंवर्धन क्षेत्राचा थोडक्यात आढावा घेते. दूध, अंडी, मांस आणि लोकर या चार प्रमुख पशुधन उत्पादनांच्या 2021-22 वर्षासाठीच्या अंदाजावरील माहितीचा आणि एकात्मिक नमुना सर्वेक्षण (आयएसएस) च्या इतर तांत्रिक बाबींसाठी हे पुस्तक म्हणजे प्राथमिक स्रोत आहे.
परषोत्तम रुपाला, मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन राज्यमंत्री डॉ. संजीव कुमार बल्यान; मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन; पशुसंवर्धन विभागाचे सचिव राजेश कुमार सिंह; अतिरिक्त सचिव वर्षा जोशी; अतिरिक्त सचिव आणि आर्थिक सल्लागार संजीव कुमार, सल्लागार (राज्य), सुमेध नागरे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
हे पुस्तक खालील लिंकवर उपलब्ध आहे: https://dahd.nic.in/schemes/programmes/animal-husbandry-statistics
* * *
S.Bedekar/P.Jambhekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1907339)
Visitor Counter : 408