सहकार मंत्रालय

कृषी क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या देशातील सहकारी संस्था

Posted On: 15 MAR 2023 8:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 मार्च 2023 

 

कृषी क्षेत्रात कार्यरत असलेल्या एकूण 1,00,428 प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS)/ मोठ्या क्षेत्रातील बहुउद्देशीय संस्था (LAMPS)/शेतकरी सेवा संस्था (FSS), आणि 619 राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँका (SCARDB), आणि प्राथमिक सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँका (PCARDBs) आहेत.

महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS), मोठ्या क्षेत्रातील बहुउद्देशीय संस्था (LAMPS) आणि शेतकरी सेवा संस्था (FSS) यांची एकत्रित संख्या 20,962 इतकी आहे.

सहकारी संस्थांची राज्य-निहाय यादी परिशिष्टात जोडण्यात आली आहे.

'सहकारातून समृद्धी' या  दृष्टीकोनातून विकास साधण्‍यासाठी  तसेच सहकार आधारित आर्थिक विकास मॉडेलला चालना देणे, देशातील सहकार चळवळ मजबूत करणे आणि ती तळागाळापर्यंत पोहोचवणे, ही उद्दिष्ट गाठण्यासाठी, मंत्रालयाने नवीन राष्ट्रीय सहकार धोरण तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. या संदर्भात सं‍बंधित  भागधारकांशी पूर्वी चर्चा करण्यात आली होती, आणि नवीन धोरण तयार करण्यासाठी केंद्रीय मंत्रालये/विभाग, राज्ये/केंद्रशासित प्रदेश, राष्ट्रीय सहकारी महासंघ, संस्था आणि सामान्य नागरिकांकडूनही सूचना मागविण्यात आल्या होत्या. नवीन धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी एकत्रित अभिप्राय, धोरण सूचना आणि शिफारसींचे विश्लेषण करण्यासाठी, सुरेश प्रभाकर प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली 2 सप्टेंबर 2022 रोजी राष्ट्रीय स्तरावरील समिती स्थापन करण्यात आली आहे. सहकार क्षेत्रातील तज्ञ, राष्ट्रीय/राज्य/जिल्हा/प्राथमिक स्तरावरील सहकारी संस्थांचे प्रतिनिधी, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे सचिव (सहकार) आणि आरसीएस, आणि केंद्रीय मंत्रालये/विभागांचे अधिकारी यांचा या समितीमध्ये समावेश आहे.

Annexure

 

 

S.No.

 

State / UT

No. of

PACS/LAMPS/FSS

SCARDBs and

PCARDB

 

States

 

 

1

ANDHRA PRADESH

2,042

-

2

ARUNACHAL PRADESH

34

-

3

ASSAM

809

-

4

BIHAR

8,481

-

5

CHHATTISGARH

2,058

-

6

GOA

93

-

7

GUJARAT

10,263

1

8

HARYANA

772

20

9

HIMACHAL PRADESH

2,198

2

10

JHARKHAND

4,293

-

11

KARNATAKA

6,040

182

12

KERALA

1,682

77

13

MADHYA PRADESH

4,541

-

14

MAHARASHTRA

20,962

-

15

MANIPUR

250

-

16

MEGHALAYA

516

-

17

MIZORAM

84

-

18

NAGALAND

1,166

-

19

ODISHA

2,709

-

20

PUNJAB

3,951

90

21

RAJASTHAN

7,442

37

22

SIKKIM

178

-

23

TAMIL NADU

4,489

181

24

TELANGANA

909

-

25

TRIPURA

292

1

26

UTTAR PRADESH

7,478

1

27

UTTARAKHAND

671

-

28

WEST BENGAL

5,144

25

 

Union Territories

 

 

1

ANDAMAN & NICOBAR ISLANDS

46

-

2

JAMMU AND KASHMIR

597

1

3

LADAKH

158

-

4

PUDUCHERRY

56

1

 

5

THE DADRA AND NAGAR HAVELI

AND DAMAN AND DIU

 

7

 

-

6

CHANDIGARH

17

-

7

DELHI

-

-

8

LAKSHADWEEP

-

-

 

Total

1,00,428

619


* * *

S.Bedekar/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1907307) Visitor Counter : 295


Read this release in: English , Urdu