संरक्षण मंत्रालय

युद्धसराव ला पेरुझ-2023

Posted On: 13 MAR 2023 6:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 मार्च 2023

ला पेरुझ या बहुस्तरीय युद्ध सरावाच्या तिसऱ्या आवृत्तीचे हिंदी महासागर क्षेत्रामध्ये 13 आणि 14 मार्च 2023 रोजी आयोजन होत आहे. या तिसऱ्या आवृत्तीमध्ये रॉयल ऑस्ट्रेलियन नौदल, फ्रेंच नौदल, भारतीय नौदल, जपानी सागरी सुरक्षा दल आणि अमेरिकी नौदलाचे नाविक, युद्धनौका आणि त्यांच्यावर तैनात असलेली हेलिकॉप्टर्स सहभागी होणार आहेत. फ्रेंच नौदलाकडून ला पेरुझ या द्विवार्षिक युद्ध सरावाचे आयोजन करण्यात येते आणि सागरी क्षेत्रातील जागरुकतेत वाढ करणे, आशिया प्रशांत क्षेत्रातील या सरावात सहभागी होणाऱ्या देशांच्या नौदलांसोबत योग्य सागरी समन्वय राखणे हा या सरावाचा उद्देश आहे. या दोन दिवसीय युद्ध सरावात समविचारी नौदलांना आपल्या नियोजनात परस्परांशी अधिक जवळचे संबंध प्रस्थापित करण्याची, समन्वय साधण्याची आणि सागरी कारवाया सहजतेने राबवण्यासाठी माहितीची देवाणघेवाण करण्याची संधी उपलब्ध होते. या युद्ध सरावात विविध प्रकारच्या गुंतागुतीच्या आणि आधुनिक सागरी युद्धविषयक कारवायांचा समावेश असेल. ज्यामध्ये पृष्ठभागावरील, हवाई हल्ला प्रतिबंधक, हवाई संरक्षण सराव, क्रॉस डेक लँडिग्ज आणि डावपेचांचा अंतर्भाव असलेल्या हालचाली आदींचा समावेश असेल.

आयएनएस सह्याद्री ही स्वदेशी बनावटीची गायडेड मिसाईल सज्ज फ्रिगेट आणि आयएनएस ज्योती हा फ्लीट टँकर या युद्ध सरावात सहभागी होईल. भारतीय नौदलाच्या या सरावातील सहभागातून मित्र देशांच्या नौदलासोबत असलेला भारतीय नौदलाचा उच्च स्तरावरील समन्वय, ताळमेळ आणि परस्पर परिचालनक्षमता आणि या नौदलांची आशिया प्रशांत क्षेत्रात नियम आधारित आंतरराष्ट्रीय स्थितीबाबतची वचनबद्धता यांचे दर्शन घडते.

 


S.Kane/S.Patil/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1906496) Visitor Counter : 331


Read this release in: Telugu , English , Urdu , Hindi