कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नागरी सेवा अधिकाऱ्यांना आजच्या प्रशासकीय कौशल्यांसह सक्षम करण्याच्या दृष्टीकोनातून आता कृत्रिम बुद्धिमता साधने आणि डेटा एनालिटिक्समध्ये प्रशिक्षित केले जात आहे : डॉ. जितेंद्र सिंह

Posted On: 12 MAR 2023 9:49PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 मार्च 2023 

 

केंद्रीय पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार, निवृत्ती वेतन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, नागरी सेवा अधिकाऱ्यांना आता आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता साधने आणि डेटा एनालिटिक्सने प्रशिक्षित आणि सुसज्ज केले जात आहे, जेणेकरुन त्यांना अशी कौशल्ये संपादित करता येतील जी आजच्या प्रशासकीय संदर्भात प्रभावी कामगिरीसाठी महत्त्वपूर्ण आहेत.  ते म्हणाले की "मिशन कर्मयोगी अंतर्गत, अभ्यासक्रम इतका संरचित केला गेला आहे की त्यात विशिष्ट कार्यक्षेत्र ,कार्यात्मक आणि वर्तणुकीशी संबंधित गोष्टींचा अभ्यासक्रमात समावेश केला गेला आहे."

पदोन्नती करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या  समावेशासाठीच्या 124 व्या इंडक्शन प्रशिक्षण कार्यक्रम (आयटीपी) च्या सहभागींना डॉ जितेंद्र सिंह संबोधित करत होते.

पंतप्रधानांच्या सामायिक राष्ट्रीय दृष्टीकोनाच्या  आवाहनाला प्रतिसाद म्हणून  राज्य नागरी सेवेतून भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नती झालेल्या अधिकाऱ्यांसाठी 124 वा ITP  तयार करण्यात आला आहे. 124व्या ITP मध्ये 2008 ते 2020 च्या बॅचमधील 131 अधिकारी सहभागी झाले आहेत. आयटीपीचे उद्दिष्ट राज्य नागरी सेवेतून  भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) मध्ये पदोन्नती झालेल्या सहभागींना भारतीय प्रशासकीय सेवेचे अखिल भारतीय स्वरूप समजून घेण्यास सक्षम करणे आणि  सार्वजनिक प्रशासन आणि देशाच्या स्थूल अर्थव्यवस्थेच्या संदर्भातील कार्य विशद करून  राष्ट्रीय दृष्टीकोन विकसित करणे हा आहे. 

डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, सहा महिन्यांचा आयटीपी अधिकार्‍यांना व्यापक राष्ट्रीय दृष्टीकोन प्राप्त करण्यास मदत करतो. ज्यामुळे त्यांना प्रशासनाचा एकूण कार्यक्षेत्राचा संदर्भ कळतो  आणि एकूण कामाचा व्याप समजून घेणे शक्य होते.

सुशासन आणि सार्वजनिक सेवा आणि केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मिशन कर्मयोगी कार्यक्रमाचे यश पाहता, डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की सरकार केंद्र आणि राज्य सरकारच्या इतर कर्मचाऱ्यांसाठीही  आयटीपीच्या धर्तीवर असे प्रशिक्षण प्रतिमान तयार करण्याचा विचार करू शकते. 

 

* * *

N.Chitale/G.Deoda/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1906211) Visitor Counter : 185
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil