सांस्कृतिक मंत्रालय
अर्जुन राम मेघवाल यांनी नवी दिल्लीत भारतीय राष्ट्रीय अभिलेखागार येथे "वुमन अँड नेशन बिल्डिंग: 1857 टू रिपब्लिक" या प्रदर्शनाचे केले उद्घाटन
Posted On:
11 MAR 2023 3:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 मार्च 2023
भारतीय राष्ट्रीय अभिलेखागाराच्या 133 व्या स्थापना दिनानिमित्त अर्जुन राम मेघवाल यांनी आज नवी दिल्ली मधील भारतीय राष्ट्रीय अभिलेखागार इथे “वुमन अँड नेशन बिल्डिंग: 1857 टू द रिपब्लिक”, अर्थात “महिला आणि राष्ट्र उभारणी: 1857 पासून प्रजासत्ताकापर्यंत” या प्रदर्शनाचे उद्घाटन केले.
यावेळी बोलताना अर्जुन राम मेघवाल म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अनाम योद्ध्यांना प्रकाशात आणण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना ज्यामध्ये महिलांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. ते म्हणाले की राष्ट्र उभारणीत आणि 1857 पासून ते स्वातंत्र्यलढ्यापर्यंत महिलांनी दिलेले योगदान हे प्रदर्शन उद्बोधक पद्धतीने अधोरेखित करते. दुर्गावती देवी आणि कस्तुरबा गांधी यांचे उदाहरण देऊन, अर्जुन राम मेघवाल म्हणाले की, हे प्रदर्शन त्यांच्या योगदानामधील महत्त्वाच्या आणि अज्ञात पैलूंवर प्रकाश टाकते.
या प्रदर्शनाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत महिलांनी दिलेले योगदान दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जुलमी वसाहतवादी राजवटीपासून मुक्त होण्याचा भारताचा स्वातंत्र्य लढा असो, बालविवाह आणि अस्पृश्यता यासारख्या सामाजिक कुप्रथांचे निर्मूलन असो, स्त्री शिक्षणासाठीचे कार्य असो किंवा स्वतंत्र भारतासाठी राज्यघटनेची निर्मिती असो- भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या युद्धापासून, ते भारतीय प्रजासत्ताकच्या घोषणेपर्यंत महिला नेहमीच आघाडीवर राहिल्या आणि त्यांनी आपल्या न पुसता येण्याजोग्या पाऊलखुणा मागे सोडल्या आहेत.
हे प्रदर्शन 30 एप्रिल 2023 पर्यंत शनिवार, रविवार आणि राष्ट्रीय सुट्ट्यांसह दर दिवशी सकाळी 10:30 ते संध्याकाळी 5:00 या वेळेत सर्वांसाठी खुले राहील.
* * *
S.Kane//R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1905878)
Visitor Counter : 254