वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत-अमेरिका यांच्यात पाचवा व्यावसायिक संवाद 2023 संपन्न


नव्या आणि धोरणात्मक विषयांवर लक्ष केंद्रित करत, काही नवीन आणि उदयोन्मुख क्षेत्रांचा समावेश करुन व्यावसायिक संवादाचा पुनर्प्रारंभ

Posted On: 10 MAR 2023 6:46PM by PIB Mumbai

 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांच्या निमंत्रणावरुन अमेरिकेच्या वाणिज्यमंत्री , गिना रायमोंडो 7 ते 10 मार्च, 2023 या काळात भारत-अमेरिका द्वीपक्षीय व्यवसायिक संवादात सहभागी होण्यासाठी नवी दिल्लीत आल्या होत्या.  भारत आणि अमेरिकेच्या वाणिज्य मंत्र्यांनी  संयुक्तपणे या संवादाचे अध्यक्षपद भूषवले. भारत-अमेरिका यांच्यातील सर्वमावेशक जागतिक राजनैतिक भागीदारी अधिक मजबूत करण्याच्या प्रयत्नांचा हा संवाद एक महत्वाचा भाग आहे. गिना रायमोंडो यांच्या नेतृत्वाखाली, अमेरिकेतील उद्योग कंपन्यांच्या प्रामुख कार्यकारी अधिकाऱ्यांचे एक उच्चस्तरीय व्यावसायिक शिष्टमंडळ भारतात आले आहे. दोन्ही देशातील सामायिक धोरणात्मक प्राधान्यांच्या निष्कर्ष- प्राणित पद्धतीवर देखील या सीईओ मंचाने भर दिला आहे.  ह्या सीईओ मंचाची पुनर्स्थापनाही नोव्हेंबर 2022 मध्ये करण्यात आली.

भारत-अमेरिका व्यावसायिक संवादाची ही बैठक 10 मार्च 2023 रोजी नवी दिल्लीत विज्ञान भवन इथे घेण्यात आली. या बैठकीत, भारत अमेरिकेतील वस्तू आणि सेवांचा व्यापार 2014 पासून दुप्पट झाला आहे, याची दोन्ही देशांच्या मंत्र्यांनी दखल घेतली. 2022 मध्ये ह्या व्यापाराने 191 डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे. दोन्ही देशांनी आपले हे व्यवसायिक सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्यासाठीच्या पावलांचे आणि विविध क्षेत्रात बाजारपेठांच्या संधी शोधण्याचे तसेच, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) आणि स्टार्टअप्समध्ये गुंतवणुकीचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले.

भारताने, राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाईपलाइन आणि पंतप्रधान गति शक्ती राष्ट्रीय बृहद आराखड्याअंतर्गत हाती घेतलेल्या उपक्रमांचे गिना रायमोंडो यांनी कौतुक केले. महत्वाच्या आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान (iCET) संदर्भात, भारत-अमेरिकेने घेतलेल्या पुढाकाराचे दोन्ही मंत्र्यांनी स्वागत केले. भारतात औषधनिर्माण उत्पादनाचा एक एक सुरक्षित पाया विकसित करण्यासाठी तसेच महत्वाच्या खनिजांसाठी (रेअर अर्थसह) विविध पुरवठा साखळ्या विकसित करण्यात भारताला असलेल्या स्वारस्याचीही त्यांनी दखल घेतली.

या बैठकीची एक महत्वाची फलश्रुती म्हणजे भारत-अमेरिका व्यावसायिक संवादाच्या आराखड्याअंतर्गत, सेमीकंडक्टर पुरवठा साखळी स्थापन करण्याबाबत झालेला सामंजस्य करार.

 

व्यावसायिक संवादातील इतर महत्वाच्या उपलब्धी :

भारत आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत, छोटे व्यावसायिक आणि उद्योजक रक्तवाहिन्यांइतके महत्वाचे आहेत, हे लक्षात घेऊन, दोन्ही मंत्र्यांनी, उभय देशातील या लघुउद्योगांमध्ये सहकार्य प्रस्थापित करण्याची गरज व्यक्त केली. तसेच, या क्षेत्रात नवोन्मेषी व्यवस्थेला प्रोत्साहन देणे आणि कोविड काळानंतर, त्यांना आर्थिक उभारी आणि विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करणे, यावर भर देण्यात आला. याच संदर्भात, दोन्ही बाजूंनी, व्यावसायिक संवादाअंतर्गत, कौशल्ये, नवोन्मेष आणि एकात्मिक विकास यासाठी नवा कार्यगट सुरु करण्याची घोषणा केली.

यामुळे डिजिटल आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानासह स्टार्ट-अप, एसएमई, कौशल्य विकास आणि उद्योजकता यावर सहकार्य वाढण्याची अपेक्षा आहे.

कोविड महामारीपूर्वीची प्रगतीची गाथा पुन्हा  सुरु करण्यासाठी तसेच अनेक नवीन आव्हानाचा सामना करत संधी विकसित करण्यासाठी प्रवास आणि पर्यटन कार्यगटही  पुन्हा सुरू करण्यात आला आहे. या कार्यगटाचे उपक्रम लघुउद्योग क्षेत्रालाही पाठबळ देणारे आहे. कारण, हॉटेल, रेस्टॉरंट, ट्रॅव्हल एजंट, हस्तकला इत्यादी व्यवसाय, ज्यांचा प्रवास आणि पर्यटन क्षेत्राशी थेट संबंध आहे, त्यांचा एमएसएमईमध्ये समावेश होतो.

यावेळी परराष्ट्र मंत्री आणि रायमोंडो यांनी "धोरणात्मक व्यापारी संवादाचीही सुरुवात केली. याद्वारे  निर्यातविषयक नियंत्रणांवर लक्ष केंद्रित करता येईल, उच्च तंत्रज्ञानविषयक व्यापार वाढवण्याचे मार्ग शोधले जातील आणि दोन्ही देशांमधील तंत्रज्ञान हस्तांतरणही सुलभ होऊ शकेल.

जागतिक जैव-इंधन सहकार्य आणि हायड्रोजन तंत्रज्ञानाच्या विकास आणि उपयोजनामध्ये एकत्र काम करण्यासाठी कटिबद्धता दोन्ही देशांनी व्यक्त केली.

अमेरिकेच्या उद्योगांना स्वच्छ EDGE एशिया उपक्रमात  सहभाग घेता यावा, यासाठी एक व्यापक व्यासपीठ म्हणून तसेच, संपूर्ण हिंद-प्रशांत प्रदेशात शाश्वत आणि सुरक्षित स्वच्छ ऊर्जा बाजारपेठ वाढवण्यासाठीचा अमेरिकेचा उपक्रम, भारत-अमेरिका उद्योगविषयक नेटवर्क (EIN) च्या संदर्भातली घोषणा यावेळी करण्यात आली. दोन्ही बाजूंनी 6G सह दूरसंचार क्षेत्रात नेक्स्ट जनरेशनची मानके विकसित करण्यासाठी एकत्र काम करण्याविषयी सहमती दर्शवली.

रायमोंडो यांनी भारताच्या जी-20 अध्यक्षपदाचे स्वागत केले.

बैठकीनंतर एक संयुक्त निवेदनही जारी करण्यात आले.

***

JPS/RA/PK

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1905784) Visitor Counter : 189


Read this release in: English , Urdu , Hindi