श्रम आणि रोजगार मंत्रालय
ईएसआयसी विशेष सेवा पंधरवड्यात सुमारे 174 कोटी रुपयांच्या सुमारे 84,000 दाव्यांवर कार्यवाही करण्यात आली
Posted On:
10 MAR 2023 7:40PM by PIB Mumbai
विमाधारक कामगार आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना दिल्या जाणाऱ्या सेवेच्या 71 वर्षांनिमित्त केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी 24.02.2023 रोजी सुरू केलेल्या ईएसआयसी (राज्य कर्मचारी विमा महामंडळ ) विशेष सेवा पंधरवड्याचा 10.03.2023 रोजी समारोप झाला. विमाधारक व्यक्ती आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांसाठी, प्रलंबित बिले/दावे मंजूर करणे, तक्रारींचे निवारण, भरड धान्य आहार आणि योगासने, औद्योगिक संकुलांमध्ये आरोग्य तपासणी शिबिरे यासारख्या कार्यक्रमांद्वारे सेवा सुलभ करण्यावर 24.02.2023 ते 10.03.2023 पर्यंतचे 15 दिवस केंद्रित होते.
विशेष सेवा पंधरवड्यात सुमारे 174 कोटी रुपयांच्या 84,000 दाव्यांवर कार्यवाही करण्यात आली. या विशेष देयके निपटारा मोहिमेचे आयोजन 2, 3 आणि 7 मार्च 2023 रोजी करण्यात आले होते.
देशभरात ईएसआयसी क्षेत्रीय कार्यालये आणि रुग्णालयांमध्ये तक्रार निवारण दिन (सुविधा समागम) 27 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2023 रोजी साजरा करण्यात आला. ईएसआयसीने 100 ठिकाणी सुविधा समागमचे आयोजन केले होते. त्यात 804 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी 769 तक्रारींचे तिथेच तात्काळ निवारण करण्यात आले. उर्वरित तक्रारी लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आल्या.
27 फेब्रुवारी रोजी जॉइंट पब्लिक इंटरफेस प्रोग्राम (निधी आपके निकट 2.0 सह सुविधा समागम) अंतर्गत, ईएसआयसी क्षेत्रीय कार्यालयाने ईपीएफओ मधील त्यांच्या समकक्षांसह एकाच ठिकाणी तक्रार निवारण करण्यासाठी सहकार्य केले. विविध ठिकाणी कामगार, त्यांचे कुटुंबीय आणि मालक यांच्यासाठी एकत्रित तक्रार निवारण शिबिरे एकाच छताखाली घेण्यात आली. ईएसआयसी ने 100 ठिकाणी अशा सुविधा समागमचे आयोजन केले होते. जेथे 1024 तक्रारी प्राप्त झाल्या, त्यापैकी 980 तक्रारींचे तात्काळ तिथेच निवारण करण्यात आले. उर्वरित तक्रारी लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आल्या.
***
N.Chitale/S.Kakade/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1905783)
Visitor Counter : 148