राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपतींनी अमृतसरला दिली भेट, श्री हरमिंदर साहिब येथे केले अभिवादन; जालियनवाला बाग येथे हुतात्म्यांना वाहिली आदरांजली


Posted On: 09 MAR 2023 7:34PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 मार्च 2023

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (9 मार्च 2023) अमृतसरला भेट दिली.

राष्ट्रपतींनी श्री हरमंदिर साहिब इथं नतमस्तक होऊन पुढील कार्यक्रमाला सुरुवात केली. राष्ट्रपतींनी गर्भगृहात जाऊन दर्शन घेतले, परिक्रमा केली आणि इतर भाविकांसह लंगरमध्येही त्या सहभागी झाल्या. सुंदर वास्तुकला आणि दैवी शांतता असलेले हे पवित्र ठिकाण शांतता आणि सुसंवादाची भावना जागृत करतं. मी देशाच्या शांती, प्रगती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली, असं राष्ट्रपतींनी श्री हरमंदिर साहिबच्या अभ्यागत पुस्तकात लिहिलं. “विशेषत: लंगरच्या वेळी सेवा आणि भक्तीच्या भावनेने अथक परिश्रम करणारे स्वयंसेवक पाहून खूप आनंद झाला. शीख गुरूंची  शिकवण  आपल्याला  बंधुता आणि एकता साधण्यासाठी प्रेरणा देत राहील, असंही त्यांनी या पुस्तकात लिहिलं.

त्यानंतर, राष्ट्रपतींनी जालियनवाला बागला भेट दिली आणि मातृभूमीसाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली वाहिली. मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या शूरवीरांविषयी  राष्ट्र कृतज्ञ असून त्यांना कायम  स्मरणात ठेवेल. हे स्मारक येणाऱ्या पिढ्यांना स्वातंत्र्याचे महत्त्व आणि त्यासाठी केलेल्या बलिदानाची आठवण करून देईल आणि राष्ट्र उभारणीत योगदान देण्याची प्रेरणा देत राहील, असं  राष्‍ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जालियनवाला बाग इथल्या अभ्यागत पुस्तकात लिहिलं.

दिल्लीत परतण्यापूर्वी राष्ट्रपतींनी दुर्गियाना मंदिर आणि भगवान वाल्मिकी राम तीर्थस्थळावर प्रार्थना केली.

 

* * *

S.Bedekar/S.Mohite/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1905426)