सांस्कृतिक मंत्रालय
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राष्ट्रीय मॉडर्न आर्ट गॅलरी इथे आठवडाभर चालणाऱ्या सोहळ्याचा आज प्रारंभ.
या सोहोळ्याचे 7 ते 12 मार्च या कालावधीत आयोजन
Posted On:
07 MAR 2023 6:41PM by PIB Mumbai
नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट अर्थात राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयात 7 ते 12 मार्च 2023 या कालावधीत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा होत आहे. या वर्षीच्या उत्सवाची संकल्पना "डिजिटऑल: लैंगिक समानतेसाठी नवोन्मेष आणि तंत्रज्ञान" ही आहे.

60 हून अधिक समकालीन महिला छायाचित्रकारांच्या कलात्मक प्रवासाचे दर्शन घडवणाऱ्या "समत्वं योग उच्यते : छायाचित्रण कलेचा उत्सव" या प्रदर्शनासह सोहोळ्याचा प्रारंभ झाला.

संग्रहालयाच्या संग्रहातून प्रेरणा मिळालेल्या महिला कलाकारांसाठी सामूहिक चित्रकला कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. संग्रहालय, मुलांसाठी विशेष पुस्तक प्रकाशनासह चित्रपट प्रदर्शन, व्याख्याने आणि क्युरेटोरियल वॉकथ्रू यासह मनोरंजक सप्ताह आयोजित करेल.

राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयात आधुनिक आणि समकालीन कलेच्या क्षेत्रातील प्रख्यात भारतीय महिलांच्या कलाकृतींचा संग्रह आहे ज्यांनी अनेक आव्हानांचा सामना करूनही अनेक वर्षांपासून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे आणि जीवनाच्या विविध क्षेत्रातील पारंगत महिलांना त्यांच्या कलात्मक तसेच छायाचित्रण प्रतिभेचे दर्शन घडवण्यासाठी एक मंच प्रदान केल्याचा संग्रहालयाला अभिमान आहे.
***
Nilima C/Vasanti /CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1904941)